Sunday, 25 December 2011

भ्रमिष्ट !! by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am

भ्रमिष्ट !!

by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am
भ्रमिष्ट !!
विखुरलेल्या स्वप्नांच्या अस्थी
रानोमाळ वेचत मी आलो
स्मृतींच्या राखेत रानोमाळ
स्वतःला शोधत मी आलो
विखुरलेल्या  सांगाड्यात
आत्म्याला मी शोधत आलो
सारे वेचता वेचता रानोमाळ
उगीच भ्रमिष्ट मी झालो !!
विकासिनी !!

No comments:

Post a Comment