Tuesday 16 August 2011

का ?? by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 12:35pm

का ??

by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 12:35pm
आपल्याच जखमांचे आपणच साक्षी
दुसऱ्याना  दाखवा कशाला ??
वेळ आपल्यावर आली ती वेळ
दुसऱ्याना सांगा कशाला  ??
वेदना तुमच्या उरातील
इतरांना कळतील का  ??
वेदनेची साक्ष द्यावया
हृदयात कोणी उतरेल का ??
विकासिनी .....

प्रीत जडली !! by Vikasini Chavan on Tuesday, August 16, 2011 at 6:14pm

प्रीत जडली !!

by Vikasini Chavan on Tuesday, August 16, 2011 at 6:14pm
प्रीत जडली !!
कसे सूर सख्या  हे जुळले
कसे गीत हे ओठी मिटले
प्रीत तुझ्यावर जडली जेंव्हा
तेंव्हा सारे हे का कळले ??
तुझ्या गीतात मी बंद होते
माझ्या हृदयात तू बंद होता
उडता न का मजला जमले ?
प्रीत तुझ्या वर जडली जेंव्हा
तेंव्हा हे सारे का कळले ??
दोन ओंडक्याची होते सागरात भेट
एक लाट येता  पुन्हा नाही भेट
कशी लाट  सख्या आली
तुझी माझी ताटातुट झाली
 कसे हे मला न कळले ?
प्रीत तुझ्यावर जडली जेंव्हा
तेंव्हा हे सारे का कळले ??
विकासिनी !!

कविता माझी वयात आली by Vikasini Chavan on Sunday, August 14, 2011 at 8:41am

कविता माझी वयात आली

by Vikasini Chavan on Sunday, August 14, 2011 at 8:41am
कविता माझी वयात आली
शब्दांचे उलगडत गुलाबी  कोडे
भावनांचे गुंफित मोती
हृदयाचा अंगणात या
कविता माझी वयात आली
रसरसून शब्दांची काया
ओठी घेवून शब्दमाया
ऐन ज्वानीच्या उंबरठ्यात आली
कविता माझी वयात आली
अल्लड प्रेमाचा शृंगार करुनी
शृंगार रसाचा विडा घेवूनी
शब्दफुले ओंजळीत घेवूनी
कविता माझी वयात आली
विकासिनी!!

बर झालं !! by Vikasini Chavan on Sunday, August 14, 2011 at 9:17am

बर झालं !!

by Vikasini Chavan on Sunday, August 14, 2011 at 9:17am
बर झालं !!
किती छान झालं असत
हृदयाला दोन कप्पे असते
एका कप्प्यात घरवाली
एका कप्प्यात सखी असती
दोन कप्पे सांभाळताना
पाकीट माझी फाटली असती
किती छान झालं असत
 मनाला दोन दारे असती
एका दारात घरवाली
एका दारात सखी असती
कधी घरवाली रुसली असती
 कधी सखी रुसली असती
दोघींना  समजावताना
अक्कल माझी फसली असती
किती छान झालं असत
मनात दोन घरे असती
एका घरात घरवाली
एका घरात सखी असती
दोघींची घरे सांभाळताना
माझी मात्र दैना झाली असती
बर झाल देवानी शानपण केल
मला एकच हृदय अन एकच मन दिल
विकासिनी !!

रांगोळी !! by Vikasini Chavan on Tuesday, August 16, 2011 at 10:13am

रांगोळी !!

by Vikasini Chavan on Tuesday, August 16, 2011 at 10:13am
रांगोळी !!
सप्तरंगी आकाशात या
सुंदर तारकांची रांगोळी घालीन
नभाचा निळा  रंग त्याला देईन
चमचमत्या विजेची किनार त्याला देईन
नभांचे वेगवेगळे  आकार त्याला देईन
इंद्रधनुचे सप्तरंग त्यावर भरून
सप्तर्षी ताऱ्यांच्या ठीपक्यात
चंद्राची चकोर सजवून
धरित्रीच्या मखमली अंगणात
हिरव्या रंगाची उधळण करीन
सुर्याप्रभेच्या केशरी रंगात
क्षिताजाला गवसणी घालेन
लुक लुक चांदण्ण्यांच्या
 ठिपक्यात मी सखोल बुडून जाईन
रांगोळी घालता घालता मी हि
एक आकाशातला  ठिपका बनून जाईन
तुझ्या अंगणात रांगोळी घालण्या
फिरुनी नवा जन्म घेईन मी !!
विकासिनी !!

सख्या !! सख्या !! by Vikasini Chavan on Saturday, August 13, 2011 at 5:05am

सख्या !! सख्या !!

by Vikasini Chavan on Saturday, August 13, 2011 at 5:05am
सख्या !! सख्या !!
हा चंद्र अबोल का ?
हे चांदणे मुके का ?
हि चंद्रप्रभा लाजरी का?
हे रात्र काजळी का ?
हे हृदय वेडे का ?
हे मजसी कोडे का ?
 सख्या !!
चन्द्रप्रभेसी या  चंदेरी किनार का?
चांदण्या गगनी या
नटुनी जमल्या का ?
हे रात्रगीत का हे हितगुज का ?
चांदण्याचा या रात्रीस धिंगाणा का ?
सख्या !!
हे नक्षत्र वेडे का?
हे नक्षत्र गीत का?
हे रातकिड्याचे रात्रीस संगीत का ?
रात्रीस काजव्यांचा हा प्रकाश का?
सख्या !!
हि  काजळमाया का ?
हे रात्रछाया  का ?
चांदण्या अश्या अंधारी लुकलुकती का ?
एकदा हि तर, एकदा ती का?
चंद्रास  हि या पडते  खळी का?
हा चंद्र गाली असा हसतो का ?
रिंगण घालूनी खेळतो हा लपंडाव का?
धावतो पुढे पुढे पण तेथेच स्थिर का ?
पहाटेच  या जागवी शुक्रतारा का ??
सख्या !! सख्या !!
 विकासिनी!!