Tuesday 9 August 2011

पालवी !! by Vikasini Chavan on Wednesday, August 10, 2011 at 10:06am

पालवी !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 10, 2011 at 10:06am
पालवी !!
करपलेल्या या  माझ्या आयुष्यात
वसंत तू  उगीच आणू नकोस
नारळाच्या या  करवंटीत
पाणी उगीच तू शोधू नकोस
तहान तुझी भागणार नाही
कोरड्या झाल्या इथल्या विहिरी
हृदय हि कोरडे पाषाण  झाले
त्यावर आता जखमा होत नाहीत
घायाळ होईल तुझे हृदय
माझ्याच्याने पहावणार नाही
हृदयाचा बांध फुटला तर
आता मी लिम्पू शकणार नाही
करपलेल्या  या आयुष्याला
आता पालवी फुटणार नाही !!
विकासिनी !!

निसर्गातील मी हि एक लाल बावटा आहे !! by Vikasini Chavan on Monday, July 18, 2011 at 8:50pm

निसर्गातील मी हि एक लाल बावटा आहे !!

by Vikasini Chavan on Monday, July 18, 2011 at 8:50pm
चाळीस वर्षाचे  आंब्याचे झाड
माझ्या जीवनातील मूक साक्षीदार आहे
माडांच्या रांगा कल्पवृक्ष्या सारख्या
 माझ्या  सोबतीला  हजर आहे
दारातील पारिजातकाचा सडा
माझ्या सकाळची सुरुवात आहे
 कोकिळकंठी मधुर गीत
 माझ्या प्रियेचा हुंकार आहे
पहाटेचा  पाखरांचा किलबिलाट
माझ्या अस्तित्वाचा धागा आहे
रजनिगन्धाच्या फुलांनी
हृदय माझे फुलले आहे
जाई जुई  कुन्दाच्या  वेलींनी
 मला आलिंगन दिले आहे
शुभ्र दंतपंक्ती वेंगाडून
त्या माझी थट्टा करीत आहे
सूर्य चंद्र  उन पाऊसा ने
न चुकता हजेरी माझी घेतली आहे
कोण म्हणते  मी एकटा आहे
परसातील कदंब  वारसा हक्काने
स्थावरा सारखी  माझी साथ देत आहे
माझा  वर्षा वसंत  शिशिर ग्रीष्म
त्या सर्वांनी पहिला आहे
निसर्गाला मी  माझ्या घरी
भेटायला  बोलावले आहे
 त्याचाच बागेतील चार फुले
त्याचाच  साठी आणली आहेत
निसर्ग आपल्या जीवनात
एक सुरेल बोलपटच  आहे
कोण म्हणतो मी एकटा आहे
निसर्गातील मी हि एक लाल बावटा आहे
विकासिनी !!

निसर्गसाज !! by Vikasini Chavan on Wednesday, July 20, 2011 at 7:37pm

निसर्गसाज !!

by Vikasini Chavan on Wednesday, July 20, 2011 at 7:37pm
निसर्गसाज !!
उषकालचे सिंदूर ललाटी कोरून ...
घन तिमिराचे अंजन घालून  ...
रानफुले केसात माळूंन ....
नक्षत्रांचा गळी साज लेवून ...
मखमली मोरपिसी शालू नेसून ..
कांचन मृगाची चोळी लेवून ...
चन्देरी विजेची सोनसाखळी घालून ...
विहग कुंजनाचे  पैंजण घालून ...
चंद्रप्रभा हि मुखी फुलारून ...
सुर्यप्रभेचा  शेला घेवून ....
मृग्कस्तुरीचा गंध फवारून ..
रवि किरणांचा रथ सजवून ...
गंध फुलांचा गजरा माळून
इंद्रधनुषी  नभी तोरण लावून ...
 चंदेरी ढगांच्या  वाटेवरुनी ...
कुसुमरसांचा मधु ओठी भिजवून ..
निसर्गमिलना चालली सजुनी धजुनी
निसर्ग रमणी सोळा शृंगार करुनी ..!!
विकासिनी  !!



हृदयवात !! By Vikasini Chavan· Friday, July 22, 2011

By Vikasini Chavan· Friday, July 22, 2011
हृदयवात !!
हृदय् वात हि जळते होवून प्रखर
विझते विरह वेदनेची घालून फुंकर
विझताना मग होते थरथर
विरहाच्या कल्पनेने अधीर !!
विकासिनी !!