Friday 19 August 2011

जखमा !! by Vikasini Chavan on Friday, August 19, 2011 at 9:40am

जखमा !!

by Vikasini Chavan on Friday, August 19, 2011 at 9:40am
जखमा !!
कुशीत अंधाराच्या आज
रात्र झिंगुनी  आली ग ....
मदन रसाचा एकाच प्याला
पिवून रात्र आली ग ...

गुलामगिरीच्या  जखडला
तोडून आज आली ग ...
संस्कार मनाचे आज
गहाण ठेवून आली ग ...

कोलाहलात प्राणाच्या
प्राणाला चिरून आली ग ...
पहाटेच  बाजेच्या आज
घोंगडयाच्या जाग आली ग ...

बाजेत घोंगड्याची आज
मखमली शाल झाली ग ...
गंधास  घोंगडयाच्या हि
अत्तराला जाग आली ग ...

सहवासात तुझ्या निर्माल्याची
आज गंधित फुले झाली ग ..
थिजलेल्या अश्रूंची माझ्या
हि आज प्राणफुले झाली ग ....

विझलेल्या प्राणात हि
झंजावात देवूनी गेली ग....
उसवून उरीच्या  जखमा
जखमांच शल्य देवूनी गेली ग !!
विकासिनी !!



साक्ष !! by Vikasini Chavan on Thursday, August 18, 2011 at 9:08am

साक्ष !!

by Vikasini Chavan on Thursday, August 18, 2011 at 9:08am
साक्ष !!
तू अन मीच होतो
साक्ष कोणाची घेतो
साक्षीत तुझ्या माझ्या
पुरावे कोठले शोधतो
मीच तुझी साक्ष अन
तूच माझा साक्षात्कार
साक्षात परब्रह्मच .. !
परब्रम्हचा साक्षात्कार ..! !
विकासिनी !!

तुझे !! by Vikasini Chavan on Thursday, August 18, 2011 at 8:52am

तुझे !!

by Vikasini Chavan on Thursday, August 18, 2011 at 8:52am
तुझे !!
तुझे  येणे....  कपिलाषष्ठीचा योग !!
तुझे असणे .... बन केवड्याचे
तुझे  बोलणे ...कोकिलकंठी  गीत !!
तुझे  नाचणे ....मयूर नाच !!
तुझे  लाजणे .... फुलांचे स्मित !!
तुझे  बहरणे .... बहर कळ्यांचा !!
तुझे  मोहरणे .... मोहर मनाचा !!
तुझे   हर्षणे  ...... वर्षाव  फुलांचा !!
तुझे हासणे .....  दिल खुलास !!
तुझे नसणे ......  केवढा हा दैव दुर्विलास !!
विकासिनी !!

काही नाही !! by Vikasini Chavan on Wednesday, August 17, 2011 at 11:38am

काही नाही !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 17, 2011 at 11:38am
काही नाही !!
"काही नाही " म्हटल तरी
बरच काही असत ...!
काही नसल्याच घोंगड  मात्र भिजत असत ..!!
"काही   कस  नसत " ...??
काही नाही तरी सगळ असत ..!
अस कस बुवा असत ??
काही  कळतच  नसत ,
काही नाही.. काही नाही  ..
म्हणत ... सगळ  होत ..!
प्रेमाचं देखील लफड ..अ.. कस  होत ..?
मग कशाला म्हणायचं काही नाही ?
काही नाही म्हणत सगळ  काही होत !!
कळत नकळतच  प्रेमाचं  फुल कस  फुलत  ??
विकासिनी !!

रांगोळी !! by Vikasini Chavan on Wednesday, August 17, 2011 at 8:59am

रांगोळी !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 17, 2011 at 8:59am
रांगोळी !!
मी आले कि माझ्याबरोबर
माझ अंगणही  येईल
तुझ्या मनातील रांगोळी तेथे घालीन
दोन्ही अंगण एक झाले कि
एक मोठे अंगण होईल
सप्तरंगी रांगोळीत
मन माझे खुलून जाईल
कधी नक्षीदार तर कधी ठिपक्यांची
प्रेत्येक वेळी नवी रांगोळी घालीन मी
मी तुला रंग देईन तू त्याला गंध दे
 मी त्या गंधाला जपून ठेवीन
 मी पुन्हा रंगात रंगेन
 मी पुन्हा ठीपक्यात ठुमकेन
  विकासिनी !!