Friday 12 August 2011

महापूर !! by Vikasini Chavan on Friday, August 12, 2011 at 1:51pm

महापूर !!

by Vikasini Chavan on Friday, August 12, 2011 at 1:51pm
महापूर !!
आसवांनी या हृदय हि वाहून गेले
पूर आला नदीला गाव सारे बुडाले
अनोळखी खुणांचे
ओळखीचे तारे तुटले
गाव सारा वाहून गेला
नयन बेईमान हि न राहिले
जुन्या गावाच्या त्या आडवाटा हि बुडाल्या
 इथल्या बोरी बाभळी हि ओळख विसरल्या
चिंचा जांभळी हि ओळखीच्या न राहिल्या
 ओढयानी हि मार्ग बदलले
साक्षितले सारे रावे हि उडाले
आसवांच्या तांडवात  हृदय हि बुडाले !!
विकासिनी !!

वाजले कि बारा !! by Vikasini Chavan on Thursday, August 11, 2011 at 1:23pm

वाजले कि बारा !!

by Vikasini Chavan on Thursday, August 11, 2011 at 1:23pm
वाजले कि बारा !!
 स्वयंपाक करता  करता
भांडी घासता घासता
बाई येळ लई झाला,
आता जावू कशी कामाला ??
आता वाजले का बारा?
 आता वाजलेच  कि बारा ??
धावता धावता धावता
बस पकडता पडता
ट्रेन पकडताना सुटली
बाई येळ लई  झाला
आता वाजलेच  कि बारा ,
आता जावू कशी कामाला ??
ट्रराफिक जॅम रोजच,
ट्रेन रोजच लेटच लेट
बी एम सी , रेल्वे म्हणते
आम्ही नाही जबाबदार !!
धावत फास्ट ट्रेन पकडून
आता जावू कशी कामाला ?
आता येळ लई झाला ,
आता वाजले कि बारा !
हझेरी लावता लावता,
 हाल जीवाचे तीन तेरा
साहेब म्हणतो बाई
 किती उशीर हा झाला ??
आता जावा तुम्ही घरी
आता वाजले कि बारा !!
उशीर झाला म्हणुनी
सायबांनी दिला ओवर टाइम !
देतो म्हणाल पगार बी ज्यादा,
आता वाजले  कि बारा
ओवर टाइम  करता करता,
  रात्रीचे वाजले बारा
आता जावू कशी घरी
 आता वाजलेच  कि बारा !
बाराचेच असे झाले तीन तेरा
येळेचा झाला इस्कुट सारा
आता जावू कशी उद्या कामाला ?,
  ..झाले संसाराचेच  तीन तेरा !!
नवऱ्याला  काय सांगू उशीर कसा झाला ??
आता माझेच वाजले साडे बारा !!
आता जावू कशी घरी ,
आता वाजले कि बारा  बारा  !!
विकासिनी !!



रात्र ढेकणांची !! by Vikasini Chavan on Thursday, August 11, 2011 at 10:21am

रात्र ढेकणांची !!

by Vikasini Chavan on Thursday, August 11, 2011 at 10:21am
रात्र ढेकणांची !!
अजून आठवे ती रात्र ढेकणांची
गाल  दोन गाली सुजून लाल झाली
जरा स्पर्ष होता  गाल सुजून जाती
उशीची मिठी हि जरा घट्ट होती
करून टाकला त्या  स्वप्नांचा चुराडा
अजून आठवे ती रात्र ढेकणांची!!
कितीदा तरी अशा रम्य रात्री
ढेकणानी  माझी उशी लाल केली
मरेना कसा  कुठल्याच  औषधांनी
अजून आठवे ती रात्र ढेकणांची
अभ्यास कराया दिली साथ मजला
रात्रभर जागवून ठेविले मनाला
जरा झोप लागता करी दंश गाली
अजून आठवे ती रात्र ढेकणांची !!
यशाचा हि माझ्या असा वाटेकरी
शोधूनी कुणाला सापडणार नाही
दिली साथ त्याने मला पामराला
विसरू कशी ढेकणांच्या जातीला
अजून आठवे ती रात्र ढेकणांची !!
 विकासिनी !!