Saturday 13 August 2011

तू दिलेल्या फुलांची प्रीतफुले झाली by Vikasini Chavan on Saturday, July 9, 2011 at 9:20am

तू दिलेल्या फुलांची प्रीतफुले झाली

by Vikasini Chavan on Saturday, July 9, 2011 at 9:20am
तू दिलेल्या  फुलांची प्रीतफुले  झाली
तुझ्या निखळ प्रेमाची सदाफुली झाली
तुझ्या  आठवणींची  मधुमालती झाली
तुझ्या अलगद स्पर्षांने लाजाळू  झाली
तुझ्या सोबतीत शब्दांची अबोली झाली
प्रेमाच्या मोहरात आंब्याचा मोहर झाली
तू दिलेल्या  फुलांची प्रीतफुले  झाली
सहवासात  तुझ्या बकुळीचा गंध होता
स्पंदनात तुझ्या रातराणीचा दरवळ होता
मिठीत तुझ्या केवड्याचा मंद वास होता
 धुंदीत तुझ्या धुंद हा मोगऱ्याचा गंध होता
आठवणींचा सोनचाफाही मंद धुंद होता
गोठलेल्या धुक्यात संवेदनांचा दवबिंदू होता
पावलोपावली प्राजक्ताच्या सड्याचा सुगंध होता
सोबतीत तुझ्या क्षणोक्षणी वेगळ्याच फुलांचा वास होता
तू दिलेल्या प्रीत फुलांची सुंगधा झाली
विरहात तुझ्या प्रीत पुलांची निर्माल्या झाली !!
विकासिनी....

माझी शाळा लई भारी होती by Vikasini Chavan on Wednesday, July 13, 2011 at 11:35am

माझी शाळा लई भारी होती

by Vikasini Chavan on Wednesday, July 13, 2011 at 11:35am
माझी शाळा लई भारी होती
एकच मास्तर  अन एकच छडी होती
न धड गणवेश होता न धड दप्तर
शाळेच्या आमच्या होत गळक छप्पर
मधल्या सुट्टीत फार मज्जा  यायची
आईन दिलेली शिळी भाकर डब्यात असायची
पंधरा ऑगस्टलाच फक्त बिस्किट मिळायची
चाकलेट, गोळ्याच  एकच टप्पर  होत
पण घ्यायला खिशात पाच  पैक न्हवत
पावसाळ्यात शाळेच्या भिंतीना  शेवाळे यायची
जमिनीवर बसून बसून मांडी बधीर व्हायची !
 पुढे कॉलेजात गेलो इंजिनेर झालो ,
गावी आलो आणि पाहिलं
माझी शाळा पडीक झाली होती
गुरांनी आपला आसरा शोधला होता
गुर हि माझ्या शाळेत शिकायला आली होती
वर्ग आठवला कि  वाटायचं माझी शाळा लई भारी होती
एकच मास्तर अन एकच छडी होती
 छडीच्या धाकात सर्व मुल होती
 माझी शाळा लई भारी होती
 विकासिनी !...

चार ओळी !! by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 12:07pm

चार ओळी !!

by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 12:07pm
नशीब  वेग वेगळे प्रेत्येकाचे
जन्मले सर्व वेग वेगळ्या वेळी
आपल्याच रीतीने जगाव्या
आपल्या नशीबच्या चार ओळी  !!
निरर्थक सारे मनाचे भ्रम
कल्पना कल्पनाच असती
निराधार या आयुष्याच्या
निराळ्याच  जन्म गाठी
आपल्याच रीतीने जगाव्या
आपल्याच नशिबाच्या चार ओळी  !!
                       विकासिनी.......

vikasini by Vikasini Chavan on Tuesday, July 12, 2011 at 3:59pm

vikasini

by Vikasini Chavan on Tuesday, July 12, 2011 at 3:59pm
निसर्ग पहायला दर्या डोंगरीच
कशाला जायचं असत??
वन बी एच के च्या खिडकीतून
दिसेल एवढाच निसर्ग असतो .
त्यातूनच आलेला सूर्याचा एखादा
किरण निसर्गाची वाट असतो
लोकल बस मधून दिसेल
एवढाच आसमंत असतो
त्याच्यावर डोकं काढायला
ऑफिस वाल्यांचा धाक असतो
संगणक वरील मोहक निसर्ग चित्र
एवढाच निसर्गाचा भाग असतो
निसर्ग पाहायला दर्या डोंगरीच
कशाला जायचं असत
उंच उंच इमारतीतून
सूर्य चंद्राला हि मज्जाव असतो
वाऱ्याला विचारून पहा जीव त्याचा
कुठे घुसमटत असतो ??
मधुचंद्रा साठी हॉटेलची
एक खिडकीच निसर्ग असतो
चंद्र दिसलाच तर ठीक
नाहीतर मधु हि गायब असतो
गोठलेल्या दवबिंदू सारख
मुंबईकरांच विश्व असत
मग निसर्ग पहायला दर्या डोंगरीच
कशाला जायचं असत ??
विकासिनी...

तुझ्यापेक्षा ?? by Vikasini Chavan on Tuesday, July 19, 2011 at 10:08am

तुझ्यापेक्षा ??

by Vikasini Chavan on Tuesday, July 19, 2011 at 10:08am
तुझ्यापेक्षा ??
तुझ्यापेक्षा प्रेम करावे तुझ्या सावलीवर
तू जवळ नसलास तरी तुझी सावली समांतर
विरघळले  नाही तरी गोडी निरंतर !!
तुझ्यापेक्षा प्रेम करावेतुझ्या आरशावर
प्रतिबिंब आपलेच पाहावे रेखून त्यावर !
कैद करावे तुझे  प्रतिबिंब  त्यावर  !!
तुझ्या पेक्षा  प्रेम करावे तुझ्या नसण्यावर
तुझ्या असण्यातल्या आठवणींच्या स्मृतींवर
स्मृतींच्या पडद्याआडच्या विस्मृतींवर  !!
विकासिनी ! !