Sunday 25 December 2011

वावटळ !! by Vikasini Chavan on Thursday, December 22, 2011 at 9:56am

वावटळ !!

by Vikasini Chavan on Thursday, December 22, 2011 at 9:56am
वावटळ !!
तुझ्या प्रेमाच्या वावटळीत
गरगर मी आसमंत फिरले
पाला पाचोळ्या सारखी
तुझ्यासोबतच फिरले
नदी नाले डोंगर दर्या
सारेसारे  एकच वाटले
तुझ्या वावटळीत मी
सुख् दुख सारेअनुभवले
पाला पाचोळ्या सारखी
 मी हेलपाटत राहिले
झंझावात होता असा
 की घरच न उरले
आकाशाचा छप्पर करून
भोवऱ्यासारखी भीरभीरले
तुझ्या वावटळीत मीच
वावटळ होवून उरले  !!
विकासिनी !!


नक्षत्रगीत !! by Vikasini Chavan on Sunday, December 18, 2011 at 11:33pm

नक्षत्रगीत !!

by Vikasini Chavan on Sunday, December 18, 2011 at 11:33pm
नक्षत्रगीत !!
सरला तो चांद पुनवेचा
उरली ती शुक्राची चांदणी
भिनला तो पहाटवारा चंद्राला
भुलली ती चांदणी शुक्राची
 उरली ती प्रीत नक्षत्रांची
झुरला तो  ध्रुव नक्षत्रतारा
चांदव फुलांचा चांदव झुला
चांदव ताऱ्यांचा नक्षत्रदिवा
सरल्या रात्रीचा सरला चांदवा
मंत्रमुग्ध मखमली हा गारवा 
ती धुक्याची शाल दाट झाली
नयनी निशेचे अंजन घालून आली
प्रीतरसात शुक्राची चांदणी न्हावून आली
उषकालचे  सिंदूर लेवून आली
नक्षत्रगीत गात बघ आली
विकासिनी !!

यल्गार !! by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am

यल्गार !!

by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am
यल्गार !!
चिरडून माणुसकीचे हृदय
दगडात शोधिती दगड हे देव
फासून काळिमा माणुसकीला
दगडास फासती शेंदूर अन तेल
शिकून झाले अतिशहाणे पण
ठेवून माणुसकीला या गहाण
ठेचली मायबाप, बंधुभगिनी
सारखी नाती हि लाख अनमोल
सोकावला काळ ऐकू न येई
माणूसकितला आक्रोश काही
रात्रीस ऐकू येई हि बनावी कोल्हेकुई
कोल्ह्यास या आता पारधी विचारत नाही
बुजागावण्यास आता पारधी घाबरत नाही
यल्गार करुनी आता कोणी उठत नाही
जो तो आता आपली कातडी सांभाळून राही
विकासिनी !!

मशाल !! by Vikasini Chavan on Saturday, December 10, 2011 at 7:28pm

मशाल !!

by Vikasini Chavan on Saturday, December 10, 2011 at 7:28pm
मशाल !!

विझल्या कितीक पुन्हा पेटवा त्या मशाली
जाहली भ्रष्ट हि सारी सरंजामशाही !

भ्रष्टला जर यम तर पहा काय होईल
देव भ्रष्टला तर कोणी न जन्मास येईल !

दिव्याच्या वातीला तेल किती जाळाल रोज
सारणात घातली ती लाकडे किती रोज !

उकरून गडे मुडदे काढाल किती रोज
काफिर दुनियेत देवाला गाढाल किती रोज !

विकासिनी !!


भ्रमिष्ट !! by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am

भ्रमिष्ट !!

by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am
भ्रमिष्ट !!
विखुरलेल्या स्वप्नांच्या अस्थी
रानोमाळ वेचत मी आलो
स्मृतींच्या राखेत रानोमाळ
स्वतःला शोधत मी आलो
विखुरलेल्या  सांगाड्यात
आत्म्याला मी शोधत आलो
सारे वेचता वेचता रानोमाळ
उगीच भ्रमिष्ट मी झालो !!
विकासिनी !!