Monday 8 August 2011

औरत !!! by Vikasini Chavan on Sunday, June 12, 2011 at 12:19pm

औरत !!!

by Vikasini Chavan on Sunday, June 12, 2011 at 12:19pm
क्या  करे हालात ऐसे क्यू  है ?
औरत को खुन्तिसे कैसे बान्ध लिये है
उडणा चाहे तो वो उड न पाये
पंख उसके क्यू काट दिये है ?
दमन उसके क्यू  फाड दिये है ?
चिलमन ने उसे काले कफन क्यू दिये है ?
चलना चाहे तो रास्ते तेढे कर दिये है
दौडणा चाहे तो पैरोमै बेढीया डाल दिये है ?
 क्या कारे हालात ऐसे क्यू है ?
सबकुच दिया है बिन मांगे बिन चाहे
बाहर जाने के सब रास्ते बंद कर दिये है
बस एक आजादी छीन ली हि
जो गांधीजी ने हमे दि है !!!
विकासिनी !!

फुल पाखरू !! by Vikasini Chavan on Thursday, July 21, 2011 at 9:47am

फुल पाखरू !!

by Vikasini Chavan on Thursday, July 21, 2011 at 9:47am
फुल पाखरू !!
रंग पंचमीचे   रंग उधळून
फुला फुलातील  अनुराग शोधण्या
अलगद उडती फुलाफुलांवर
मधुरसाचे कराया सेवन
गुज फुलांचे जाणून घेण्या
हलकेच उडती फुलाफुलांवर
रंग फुलांचे अंगी उतरवून
मधुर प्रेमाचा निरोप देण्या
नाचती बागडती फुलाफुलांवर
कोमल हृदयी कोमल आर्जव
फुलपाखरू उडे  फुलाफुलांवर
मुग्ध होवुनी मी माझे पण
फुल पाखरू झाले माझे मन  !!
विकासिनी !


श्रावण झुला !! by Vikasini Chavan on Saturday, July 23, 2011 at 6:13pm

श्रावण झुला !!

by Vikasini Chavan on Saturday, July 23, 2011 at 6:13pm
श्रावण झुला !!
सरी वर  सरी पावसाच्या धरुनी
घेवून भरारी दऱ्या  डोंगरी
बांधून  उंच आकाशी श्रावण झुला  !!
त्याच सरिंची घसरगुंडी करुनी
पोहचुनी  इंद्रधनुच्या कमानी
पाहण्या  सप्तरंगी श्रावण झुला  !!
वृक्ष वल्लींचा  गोफ बंधूनी
फुला फुलांचे ताटवे गुंफुनी
झुलावा हरित श्रावण झुला  !!
हिंदोळ्यावर मन तरंगाच्या
सुख दुखाच्या आकाशी घ्यावा
खुशाल सुखाचा श्रावण झुला  !!
विकासिनी  !!

पाऊस ! by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 9:22am

पाऊस !

by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 9:22am
पाऊस !
तुझ्या प्रेमाच्या पावसात
 काठ माझे वाहून गेले
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
 अंतरंग माझे भिजून गेले
तुझ्या प्रेमाच्या काठावरले
 घर माझे वाहून   गेले
तुझ्या आठवणीच्या गावामधले
  पक्षी सारे उडून गेले
तुझ्या प्रेमाच्या  वाटेवरले
 झाड तुलसी वृंदावन झाले
तुझ्या गात्रातील दगड गोटे
  देवरूप घेवून आले !!
           विकासिनी !!


कविता काय असते ?? by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 11:56am

कविता काय असते ??

by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 11:56am
कविता काय असते ??
हृदय कवीचे  कविता ,
स्पर्श मनीचे  कविता ,
भाव जीवाचे  कविता ,
स्वप्न मनीचे  कविता,
फुल मनीचे  कविता ,
प्रीत मनाची  कविता ,
गोत्र मनाची  कविता,
प्रेरणा मनाची कविता ,
शृंगार मनाची कविता ,
अंतरात्मा  मनाची कविता,
कवितेला शेवट नसतो ,
स्वल्प विराम ,
अर्ध विराम ; असते कविता ,
कुडीत प्राण असेतोवर असते कविता ,
एक प्रेरणा ,एक स्फूर्ती ,
एक आठवण ,एक स्पर्श हृदयाचा ,
थांग नाही कविमनाच्या उडण्याचा !!
विकासिनी !!


आजची गटारी !! by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 5:44pm

आजची गटारी !!

by Vikasini Chavan on Sunday, July 24, 2011 at 5:44pm
अमावास दिव्यांची आठवे
सुरुवात चातुर्मासाची
श्रावणाच्या आगमनाची
आषाढ अमावस्या करूया साजरी
तेवून  लक्ष दिव्यांच्या  ज्योती
तमसो  मा ज्योतिर्रगमयाची   !!
सुर्यप्रकाशाच्या तेजाची !
अग्निदेवाच्या मंगल संदेशाची !
अहिंव्सेच्या मंगल विचारांची
जीवन प्रकाशमान करण्याची
हिंदू धर्माच्या परंपरेची  !!
आजची गटारी  आठवते  फक्त
कोंबडीवडे ,मटणाच्या रस्ष्याची ,
मच्छी कडी आणि बिर्याणीची
सोबत पिणाऱ्या दोस्तांची जोडी
देशी विदेशी बाटल्यांची गोडी
होवून बेफाम मद्यधुंद
पडती गटारी  हे वंशाचे दिवे
साजरी करायला आवास दिव्याची
गटारी म्हणजे गटारगंगा नाही
तुंबलेल्या गटारी साफ करणे आहे
रोगराईवर  मत करणे आहे
वंशाचे दिवे पडता  गटारी
घरचे दिवे लावणार कोण ??
विचार यांचे बदलणार कोण ??
गटारी मन साफ करणार कोण ??
विकासिनी !!


गाढव नाती !! by Vikasini Chavan on Wednesday, July 27, 2011 at 1:53pm

गाढव नाती !!

by Vikasini Chavan on Wednesday, July 27, 2011 at 1:53pm
गाढव नाती !!
काही नाती अशीच
वहावयाची  असतात ,
गाढव बनून ,
गाढवासारखी ,
कमीत कमी नात्यातील ,
गाढवपणा सिद्ध करण्यासाठी ,
न तुटणारी,
न जुळणारी ,
पण प्रिय गाढव नाती !!
विकासिनी !!

उधार पाहिजे का ?? by Vikasini Chavan on Thursday, July 28, 2011 at 8:36am

उधार पाहिजे का ??

by Vikasini Chavan on Thursday, July 28, 2011 at 8:36am
उधार पाहिजे का ??
कोणीतरी विचारले उधार पाहिजे का ??
मी म्हटले काय काय देता उधार ??
 ते म्हणाले माझ्याजवलील काही चांगुलपणा ,
मी म्हटले तो तरी तुमचा आहे का ??
ते म्हटले जिने दिला ती माझी आई आहे ,
मी विचारले तुमचे मी पण ,माझेपण उधार आहे का ??
देतायेईल तर द्या कुठे विकीन म्हणते ,
ते म्हणाले हा हिशेब लागेल कधी ??
मी म्हटले काळजाला हि इथे किंमत शून्य असते !!
विकासिनी !!

पहाट !! by Vikasini Chavan on Thursday, July 28, 2011 at 9:18am

पहाट !!

by Vikasini Chavan on Thursday, July 28, 2011 at 9:18am
पहाट !!
कविता पहाट झाली
तेव्हा मनाला जाग आली
मनाच्या अंगणात
प्राजक्ताची बरसात झाली !!
झुंजू मुंजू मन माझे
पहाटेच गावू लागी
पाखराची किलबिलाट इथे
मनाला साद घाली
काय सांगू कुठे आहे ??
मन माझे आडकलेले
सजण मनीचा अजूनही निजालाच आहे !!
विकासिनी !!

जीवन दान ! By Vikasini Chavan· Friday, July 29, 2011

By Vikasini Chavan· Friday, July 29, 2011
जीवन दान !
थीजलेल्या मनाला
आज परत पालवी फुटली
गोठलेल्या जीवाला
आज परत अंकुर फुटले
आसवांनी आज त्यांना
परत जीवनदान दिले
अश्रूच आज पुन्हा मला
 का विचारू लागले ??
    विकासिनी !!

माझी माय !! by Vikasini Chavan on Saturday, July 30, 2011 at 1:23am माझी माय !!

माझी माय !!

by Vikasini Chavan on Saturday, July 30, 2011 at 1:23am
माझी माय !!
चंदनापरी झिजते आहे
संसार होळी मध्ये जळते आहे
संसाराच्या घासा घाशीत
हात तिचे फाटले आहेत
रोजच्याच तव्याचा चटक्यांनी
 काळीज तिचे डागले आहे
हातावरील चाकूच्या व्रणानी
नशिबाच्या रेषा बदलल्या आहेत
मूक भावनांची मुस्कटदाबी
रोजचीच अशी चालू आहे
आसवांच्या तिच्या  रोजचेच
मैलाचे  दगड झाले आहेत
संसाराच्या फाटक्या झोळीचे
 दान तिच्या पदरात आहे
दया क्षमा शांतीची दोरी
 तिच्याच  हातात आहे !!
भल्या बुऱ्या संसारात
ती मात्र एकटीच आहे
अग्निदिव्य  संसाराचे
रोज नवे झेलते आहे
एकटीच कटावरी आपल्या
 घाघर प्रेमाची पेलते आहे
संसाराच्या चार गाठी
उसवून रोज शिवते आहे
अंधारलेल्या  खिन्न मनाने
तीन्हीसांजेचा दिवा लावते आहे
तिच्या कमनशिबी मात्र
फक्त  घनघोर अंधारच आहे
विकासिनी !!


थांब जरा !! by Vikasini Chavan on Friday, July 29, 2011 at 11:15pm

थांब जरा !!

by Vikasini Chavan on Friday, July 29, 2011 at 11:15pm
थांब जरा !!
पहाटेला म्हणव  थांब जरा
आत्ताच कुठे सजणाला लागला डोळा
देते तुला एक गोड गोड  पापी
उशिरानेच  जरा उगव बाकी !!
देते तुला गोड एक मिठाई
थांब सांग सूर्याला उगवू नको  आत्ताच !!
देते तुला  छान छान साडी
काळ्या रंगाची खडीची
किरणांचे त्याने झाक सारे आकाश !!
देते तुला सकाळची न्याहारी
पण जरा थांब  घटकाभरी
सजण माझा अजून आहे खाटेवरी !!
विकासिनी !1

हाई जिंदगी !! by Vikasini Chavan on Monday, August 1, 2011 at 9:47pm

हाई जिंदगी !!

by Vikasini Chavan on Monday, August 1, 2011 at 9:47pm
हाई जिंदगी !!
हाई !जिंदगी दुल्हन की तरह रंग बदलती है,
कभी खिलाती है  खिलकर
तो कभी ,मुरज्हा जाती है मौसम की तरह  ,
कभी तड़पाती है मरते दम तक !!
हाई !जिंदगी दुल्हन की तरह रंग बदलती है !!
कभी सपनोमै  हंसाती  है
कभी जागते हुए रुलाती है
कभी सपना बन जाती है
कभी हकीकत सपना बना देती है
हाई! जिंदगी दुल्हन की तरह रंग बदल देती है!
कभी जगाती है नींद से
कभी सुलाती है हमेशा के लिए
हाई ! जिंदगी दुल्हन की तरह रंग बदलती है
 विकासिनी !!

सौभाग्य अलंकार !1 By Vikasini Chavan· Tuesday, August 2, 2011

By Vikasini Chavan· Tuesday, August 2, 2011
सौभाग्य अलंकार !1
कुमकुम लाली सांज सकाळी
निसर्ग रमणी लेवुनी ललाटी करिते शृंगार ,
निसर्ग राजा भाग्यात  मिळावा  ,
म्हणुनी लेविती  सौभाग्य अलंकार !!
विकासिनी !!

स्वप्नसखा !! by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 9:08am

स्वप्नसखा !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 9:08am
स्वप्नसखा !!
स्वप्नातल्या स्वर्गात  विहरांया  रोज जावे
स्वप्नातल्या मनाचा  स्वप्नात वेध घ्यावे
स्वप्नील जीवनाचा स्वप्नील साज ल्यावे
स्वप्नसख्याला स्वप्नात भेटण्या  रोज जावे
हरवलेल्या स्वप्नांच्या मागावर रोज जावे
स्वप्नातल्या चांदण्या मोजण्या रोज  जावे
स्वप्नातल्या सुखाचा आस्वाद घेण्या जावे
स्वप्नमोर  सुखाचा फुलवी असा पिसारा
स्वप्नातल्या चांदव रातीचा गंध गोड वारा
स्वप्नात झिंगुनी या मंद धुंद रोज व्हावे
चांदणे हे  स्वप्नसुखाचे शिंपुनी रोज यावे !!
विकासिनी !!

देवूळ सोडून धाव !! by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 10:34am

देवूळ सोडून धाव !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 10:34am
अखेरचा  हा तुला दंडवत ,
सोडून जा हे गाव ,
तुझ्या दानाचा ,
धर्माच्या  नावाखाली
देवळात  भ्रष्टाचार ,
देवा !!,
देवूळ सोडून..... धाव देवा !,
अखेरचा हा तुला दंडवत !
तुला दंडवत !
तुला दंडवत !
देवूळ सोडून .....धाव  देवा !!
विकासिनी !

घर - घर ! by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 10:01am

घर - घर !

by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 10:01am
घर - घर !
घर म्हणजे दगड मातीचा डोलारा नसावा
हृदयात गोड प्रेमाचा  निर्मल झरा असावा
घर म्हणजे कुटुंबातील माणसे नसावी
माणसातील नात्याला माणुसकी असावी
घर म्हणजे नुसताच छपराचा  आधार नसावा
घरातील माणासांना नात्याचा आधार असावा
घर म्हणजे नुसता केरकचरा नसावा
घासून पुसून स्वच्छ केलेला दिवा दिसावा
घर म्हणजे रामागडीचा पसारा नसावा
घराचा रामागडी पण घरातला वाटावा
घर म्हणजे कळकट  संसार नसावा
तांदळा सारखा पारदर्शक गिलावा असावा
घर म्हणजे रुक्ष  वाळवंट नसाव
एक तरी तुळशीचा रोप घरासमोर असाव
घर म्हणजे अंधाराचं साम्राज्य नसाव
एका तरी दिव्याचा घरात राज्य असाव !!
विकासिनी !

चूल माझी का फितूर झाली?? by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 7:07pm

चूल माझी का फितूर झाली??

by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 7:07pm
स्वयंपाक अर्धा बाकी होता
चूल माझी का फितूर झाली ?
संसार अर्धा झाला होता
ओली लाकडे जळता जळता
हात पोळले अर्ध्या संसारात
प्रीत माझी का काफिर झाली
संसार अर्धा बाकी होता
चूल माझी का फितूर झाली ??
फुंकणीच्या फुंकार्याने
राख साऱ्या घरभर झाली
अर्ध्या संसारात माझ्या
पोरा बाळाची वाताहत झाली
अर्ध्या विझल्या निखाऱ्यासारखी
 अर्धी माझी अवस्था झाली
स्वयंपाक अर्धा बाकी होता
चूल माझी का फितूर झाली ??
विकासिनी!!

आशियाना ! by Vikasini Chavan on Monday, August 8, 2011 at 10:16am

आशियाना !

by Vikasini Chavan on Monday, August 8, 2011 at 10:16am
 आशियाना !
दिल के आशियाने को हम
मेहफुस जगह  ढूंढने चले
हाई! हम कही ऐसी जगह  ढूंढने चले !
हाई !दिल के आशियाने को
 हम ये क्या ढूंढने चले ??
इतने बड़े जहाँ मैं हम
ऐसी कौनसी जगह ढूंढने चले ??
खुदाके घर भी जाके आये
दिल के आशियाने को हम
 मेह्फुस जगह ढूंढने चले
हाई!हम तो सारा जहाँ ढूंढने चले
इतने बड़े जहाँ मैं हम
सारा आलम  क्यूँ खोके आये
दिल के आशियाने को हम
 मेह्फुस जगह ढूंढने चले!
विकासिनी!!

राख हि सवेत घेवून गेला !! by Vikasini Chavan on Sunday, August 7, 2011 at 12:48am

राख हि सवेत घेवून गेला !!

by Vikasini Chavan on Sunday, August 7, 2011 at 12:48am
प्रेम नव्हते भाग्यात माझ्या
राख कपाळी देवून गेला
प्रेमात नाही उरता आले
राख हि सवेत घेवून गेला !!
वाऱ्यावरी गंध उडाला
आठवणींच्या धुरात त्या
आठवणीत न उरता आले
गंधही सवेत घेवून गेला !!
काहीच नाही देता आले
जाता जाता काही न उरले
हातात नाहीच उरता आले
रिकाम्या हाताने परत गेला !!
जीवन सरले सरता सरता
राख स्वतः होवून गेला
प्रेमात नाही उरता आले
राख हि सवेत घेवून गेला !!
विकासिनी!!


vikasini-rammorewordpress.blog​spot.com

विकासिनी