माझी माय !!
by Vikasini Chavan on Saturday, July 30, 2011 at 1:23am
चंदनापरी झिजते आहे
संसार होळी मध्ये जळते आहे
संसाराच्या घासा घाशीत
हात तिचे फाटले आहेत
रोजच्याच तव्याचा चटक्यांनी
काळीज तिचे डागले आहे
हातावरील चाकूच्या व्रणानी
नशिबाच्या रेषा बदलल्या आहेत
मूक भावनांची मुस्कटदाबी
रोजचीच अशी चालू आहे
आसवांच्या तिच्या रोजचेच
मैलाचे दगड झाले आहेत
संसाराच्या फाटक्या झोळीचे
दान तिच्या पदरात आहे
दया क्षमा शांतीची दोरी
तिच्याच हातात आहे !!
भल्या बुऱ्या संसारात
ती मात्र एकटीच आहे
अग्निदिव्य संसाराचे
रोज नवे झेलते आहे
एकटीच कटावरी आपल्या
घाघर प्रेमाची पेलते आहे
संसाराच्या चार गाठी
उसवून रोज शिवते आहे
अंधारलेल्या खिन्न मनाने
तीन्हीसांजेचा दिवा लावते आहे
तिच्या कमनशिबी मात्र
फक्त घनघोर अंधारच आहे
विकासिनी !!
वाह छान !
ReplyDeletesunder...apratim...keep it up...vikas
ReplyDelete