स्वप्नसखा !!
by Vikasini Chavan on Wednesday, August 3, 2011 at 9:08am
स्वप्नातल्या स्वर्गात विहरांया रोज जावे
स्वप्नातल्या मनाचा स्वप्नात वेध घ्यावे
स्वप्नील जीवनाचा स्वप्नील साज ल्यावे
स्वप्नसख्याला स्वप्नात भेटण्या रोज जावे
हरवलेल्या स्वप्नांच्या मागावर रोज जावे
स्वप्नातल्या चांदण्या मोजण्या रोज जावे
स्वप्नातल्या सुखाचा आस्वाद घेण्या जावे
स्वप्नमोर सुखाचा फुलवी असा पिसारा
स्वप्नातल्या चांदव रातीचा गंध गोड वारा
स्वप्नात झिंगुनी या मंद धुंद रोज व्हावे
चांदणे हे स्वप्नसुखाचे शिंपुनी रोज यावे !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment