Monday 8 August 2011

घर - घर ! by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 10:01am

घर - घर !

by Vikasini Chavan on Thursday, August 4, 2011 at 10:01am
घर - घर !
घर म्हणजे दगड मातीचा डोलारा नसावा
हृदयात गोड प्रेमाचा  निर्मल झरा असावा
घर म्हणजे कुटुंबातील माणसे नसावी
माणसातील नात्याला माणुसकी असावी
घर म्हणजे नुसताच छपराचा  आधार नसावा
घरातील माणासांना नात्याचा आधार असावा
घर म्हणजे नुसता केरकचरा नसावा
घासून पुसून स्वच्छ केलेला दिवा दिसावा
घर म्हणजे रामागडीचा पसारा नसावा
घराचा रामागडी पण घरातला वाटावा
घर म्हणजे कळकट  संसार नसावा
तांदळा सारखा पारदर्शक गिलावा असावा
घर म्हणजे रुक्ष  वाळवंट नसाव
एक तरी तुळशीचा रोप घरासमोर असाव
घर म्हणजे अंधाराचं साम्राज्य नसाव
एका तरी दिव्याचा घरात राज्य असाव !!
विकासिनी !

No comments:

Post a Comment