Tuesday 15 November 2011

वाट by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 7:43pm

वाट

by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 7:43pm
वाट
वाटांनाही वाटते वहीवाटांनी चालत रहावे
चुकले तर पळवाटांना  विचारावे
हरवले तर आडवाट होवून रहावे
वाट संपली तर तिथेच थांबावे
वाटांनाही वाटले कधी मैत्री करावे
मैत्रीचा कधी चौक होवून रहावे
वाटसरुंशी हितगुज करावे
पण वाटचाल काही थांबत नाही
वाटेवरच्या वळणानं नवीन वळण द्यावे
वहीवाट सोडून चालत रहावे
वाटसरुन्ना  वाट दाखवत रहावे
वाट चुकलेल्याना वाटेवर आणावे
विकासिनी !!


मधु चंद्र!! by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 8:50am

मधु चंद्र!!

by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 8:50am
मधु चंद्र!!
चंद्रमौळी झोपडीतून माझ्या
पहिल्या तुझ्या अनंत कला
रोज तुझा नवा मधु चंद्र
अन रोज नव्या चांदण्या
विकासिनी !!

दिव्याज्योती ! by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 7:36pm

दिव्याज्योती !

by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 7:36pm
मी दिवा अन
तू ज्योती
मधुर मिलनात

होती दिव्याज्योती !
vikasini !!

अंजली !! by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 9:44am

अंजली !!

by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 9:44am
अंजली !!
प्रेमसागरात या
अर्पुनी अश्रुंचे अर्ध्य
वाट पहिली मी
होईपर्यंत सुप्रभात
वाटेवर तुझ्या कोमल
प्रीतीसुमने हि कोमेजली
हाती फक्त उरली
निर्माल्याची पुष्पांजली !!
विकासिनी !!

स्पर्श हळव्या मनाचे !! by Vikasini Chavan on Thursday, November 10, 2011 at 11:55am

स्पर्श हळव्या मनाचे !!

by Vikasini Chavan on Thursday, November 10, 2011 at 11:55am
 स्पर्श हळव्या मनाचे !!
चंद्रमौळी जरी असले
झोपडे आपले असावे
ठीगळाचे जोड असले
तरी उबदार असावे
रेशमी जरी  नसले
धागे जोडलेले असावेत
विणीत धाग्यांच्या फक्त
तुझे माझे नाव असावे
तुझ्या हतात माझे
आणि माझ्या हातात
तुझे हृदय असावे
तुझ्या माझ्या हृदयात
स्पर्श हळव्या मनाचे असावेत !!
विकासिनी !!

हवन !! by Vikasini Chavan on Monday, November 7, 2011 at 4:31pm

हवन !!

by Vikasini Chavan on Monday, November 7, 2011 at 4:31pm
हवन !!
विरहात तुझ्या
वृक्ष्यवल्लीना कवटाळले
अश्रू सारे माझे
नद्यानाल्यानी वाहिले
घोर जीवाचा
काळजात माझ्या राहिले
प्रीतीसागरात या
विरहगीत ज्वालामुखी झाले
त्या ज्वालामुखीत
माझ्या हृदयाचे हवन झाले
विकासिनी !!

दिवाळी !! by Vikasini Chavan on Friday, October 28, 2011 at 2:44pm

दिवाळी !!

by Vikasini Chavan on Friday, October 28, 2011 at 2:44pm
दिवाळी !!
थोडंसं श्वासात  साठवू तर दे
मग हवंतर जा
थोडंसं मनात आठवू तर दे
मग हवंतर जा
थोडासा मोहक स्पर्श मोहरू तर दे
मग हवंतर जा
थोडसं मनपाखरू  सावरू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी प्रीतफुले  फुलू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी प्रीतरीत मोडू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी झिंग मनाला येवू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी पेंग मनाला येवू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी दिवाळी साजरी तर करू दे
मग हवं तर जा
विकासिनी !!

शुभ दीपावली !! by Vikasini Chavan on Friday, October 21, 2011 at 9:47pm

शुभ दीपावली !!

by Vikasini Chavan on Friday, October 21, 2011 at 9:47pm
शुभ दीपावली !!
उजळून लक्षकोटी दिवे
नक्षत्र तारकांचे नभी
चांदोबा उभा गगनी
आकाशदिवा बनुनी
नेत्र दीपक लावण्य
पाहता नक्षत्र दीपावली
उजळून आल्या जीवनी
प्राण ज्योतींच्या मशाली !!
शुभ दीपावली !!
विकासिनी !!


कौन?? by Vikasini Chavan on Tuesday, October 18, 2011 at 1:33pm

कौन??

by Vikasini Chavan on Tuesday, October 18, 2011 at 1:33pm
कौन??
टूटी हुई कश्ती का साहिल कौन बनेगा ?
बिखरे हुए रास्तों का राही कौन बनेगा ?
अंजान डगर की पतवार कौन संभालेगा ?
उभरते हुवे तूफान का फानूस कौन बनेगा ?
बुज़ते हुवे दियेकी रोशनी कौन बनेगा ?
शूलके अंगारकी राख कौन बनेगा ?
तपते हुवे अंगारोपर कौन पागल चलेगा ?
गिरते हुवे बिजली की मुस्कराहट कौन बनेगा ?
विकासिनी !!

काकड आरती !! by Vikasini Chavan on Monday, October 17, 2011 at 3:54pm

काकड आरती !!

by Vikasini Chavan on Monday, October 17, 2011 at 3:54pm
काकड आरती !!
धुरात या वासनांच्या
श्वास मनीचा कोंडला
वाहत आली घाण पाहुनी
चित्त प्राण घोटला
घृणा कशी करावी
या निर्लज्ज पामरांची
वासनेच्या अंधारात
जो तो का बरबटलेला ?
मुक्ती कशी व्हावी देवा ?
कसा मिळावा मोक्ष यांना ?
तुझ्या दारापर्यंत यायची
नाही या निर्लाज्जांची लायकी
बरे झाले तू दिसत नाहीस कोणाला
तुला हे पाहून झोप कशी लागली ?
तुला जागवण्या साठी  हे देवा
गावू कोणती मी काकडआरती ??
विकासिनी !!