चांदणे !!

by Vikasini Chavan on Friday, January 13, 2012 at 7:27pm
चांदणे !!
हे चांदणे नभीचे लाजून आज गेले
प्राजक्त दारीचे सुकवून कोण गेले
दगडास या आज भिजवून कोण गेले
लालिमा नभीची उतरवून कोण गेले
रात्र होती अमावस्येची अंधारून गेले
चंद्रास या कळेना उगवून कोण गेले
साक्षीला चंद्राच्या होत्या चांदण्या परंतु
चोरून आज तुजला भेटून कोण गेले ?
आतुरल्या भेटीला दाटून हृद्य गेले ,
कसे सांगू तुला हे निर्र्लज्ज ते बहाणे !!
चित्ती चीतारशील त्या स्पर्शाना
बघ हळवे ते बरसून कोण गेले ?
उसण्याच स्पर्शाने त्या लहरून मन हळवे गेले ,
सत्यात भ्रमिष्ट भुलवून कोण गेले
संक्रमण हे कळेना कोणाचे झाले
चांदणे हे सुखाचे उधळून कोण गेले ?
हुरहूर ती प्रीतीची झुरण्या
जीवास हेलावून कोण गेले ?
कोण होते कोण होते शोधिले गात्री मनी ,
हळव्या हृदयास या पोखरून कोण गेले ?
गेल्या दिशाही भरकटून कोणी कडे
चंद्राच्या सावलीचे  चांदणे कुठे पडे
विकासिनी !

· · · Share · Delete