Sunday 25 December 2011

यल्गार !! by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am

यल्गार !!

by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am
यल्गार !!
चिरडून माणुसकीचे हृदय
दगडात शोधिती दगड हे देव
फासून काळिमा माणुसकीला
दगडास फासती शेंदूर अन तेल
शिकून झाले अतिशहाणे पण
ठेवून माणुसकीला या गहाण
ठेचली मायबाप, बंधुभगिनी
सारखी नाती हि लाख अनमोल
सोकावला काळ ऐकू न येई
माणूसकितला आक्रोश काही
रात्रीस ऐकू येई हि बनावी कोल्हेकुई
कोल्ह्यास या आता पारधी विचारत नाही
बुजागावण्यास आता पारधी घाबरत नाही
यल्गार करुनी आता कोणी उठत नाही
जो तो आता आपली कातडी सांभाळून राही
विकासिनी !!

1 comment:

  1. manuski tunach manus nighun gela aahe, yelgar karayla urlech kon?

    ReplyDelete