Sunday 4 December 2011

रानपाखरू !! by Vikasini Chavan on Wednesday, November 30, 2011 at 8:58am

रानपाखरू !!

by Vikasini Chavan on Wednesday, November 30, 2011 at 8:58am
रानपाखरू !!
आकाशातल पाखरू
उंच आकाशी उडे कसं
पंखावर आभाळ झेली कसं
पाखरू होवुनी पाहूया गडे
प्रेम मुक्या पाखराचे समजण्या
पंखाची भाषा शिका गडे
रानपाखारा शोधण्या
रानीवनी फिरुनी
मनपाखरू होवुनी
उडू द्या गडे 
विकासिनी !!

मन !! by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 6:25pm

मन !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 6:25pm
 मन !!
मन गुंता रे गुंता
सतराशे साठ विचारांचा
मन चिंत्याचा रे गुंता
सतराशे साठ विषयांचा
मन उमले उमले
जशी कमळाची दले
मन अवीट अवीट
जसा मधाच ग बोट
मन खवीट  खवीट
येई मनास झीट
मन कृष्णाच शिवार
तेथे राधा प्रितीच पिक
जस कान्हाच्या डोक्यावर
शोभते ग मोरपीस एक !!
विकासिनी !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 12:44pm सोनं !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 12:44pm
सोनं !!
आली आली सुप्रभातीच
माझ्या घरी सूर्याची ग उन्हं
पिकवूनी गेली माझ्या
घरादारा मधी ग सोनं
सूर्यदेवांन साऱ्या घरादाराला
सोन्यानी न्हावू घातलं
सुर्यादेवाच्या जादून
सोन्याच शिवार फुलल
सोनं सोनं काय म्हणता
खूप महाग झालं ??
घेवून जा माझ्या घरातून
घर सोन्यान न्हालं
सुर्यादेवा तूझं सोनं
माझ्या मनात माईना
तुझ्या सोन्याचा लखलखाट
काही केल्या ग जाईना
कशाला फुका शिनगार
कशाला पाहू  मी आईना
हृदयातल्या प्रीतीच्या पुढे 
वरमला बघ आईना
सोनं सोनं सोनं सोनं
सोनं रातीला घावल
रातीच्या अंधारात
सोनं मातीमोल झालं !!
विकासिनी !!


lime light !! by Vikasini Chavan on Saturday, December 3, 2011 at 10:31am

lime light !!

by Vikasini Chavan on Saturday, December 3, 2011 at 10:31am
The foggy ...chilled.........
.........effervescence....
   .........enchanting ..
....u n me
....to be ....
....dear... n ........near
......n  feel closer... n ..closer ...
the chant ...of the
...full moon ...night  ........
with ........flurosant ..twilight ......
flurishes......heavenly .......delight
revolving   u..  n  me... in the
cherished ...........
...limelight
............limelight
...................n ..the limelight  ....!!
vikasini !!

अडगळ!! by Vikasini Chavan on Friday, December 2, 2011 at 10:08am

अडगळ!!

by Vikasini Chavan on Friday, December 2, 2011 at 10:08am
अडगळ!!
अडगळीतले फोटो चाळताना
आठवण तुझी झाली
मनांच्या कॅमेर्याताला
मग रोल  उलगडून जाई
दिवस असे भूर्रकन
वार्यासारखे उडून गेलेले
क्षणातच डोळ्यासमोरून
ते क्षण चित्रित झालेले
आठवणींनी मग मनात
काहूर माजवलेले
दिवसाची रात्र अन
रात्रीचा दिवस करणारे
बेधुंद मन हेलावून टाकणारे
आज का मग अडगळीत असे पडले ?
पुन्हा तो चित्रपट पाहता येणारच नाही
अक्शन रीप्लेय होणारच  नाही
आठवणीची अडगळ साचतच जाईल
अडगळीतल्या फोटो सारखी !!
तरीपण झेलतच राहील
सुख दुखाच्या क्षणांना
आडगळीसारखीच !!
विकासिनी!!



गर्दीतला चेहरा !! by Vikasini Chavan on Friday, November 25, 2011 at 12:35pm

गर्दीतला चेहरा !!

by Vikasini Chavan on Friday, November 25, 2011 at 12:35pm
गर्दीतला चेहरा !!
अनोळखी गर्दीतला
ओळखीचा चेहरा
कधी हुरहूर लावणारा
कधी काहूर माजवणारा
अशाश्वत असा पण
 शाश्वत वाटणारा
काधी सैरभैर धावणारा
कधी एकाकी चालणारा
आपला कुणी शोधणारा
आपल्या परीने चालणारा
क्षणात हरवून जाणारा
सतत शोधात राहणारा
मनाची अधीरता वाढवणारा
गर्दीतला अनोळखी चेहरा !!
विकासिनी !!


शिशिर !! by Vikasini Chavan on Tuesday, November 22, 2011 at 3:52pm

शिशिर !!

by Vikasini Chavan on Tuesday, November 22, 2011 at 3:52pm
शिशिर !!
शिशिराच्या प्राक्तनी
पानगळच का आहे ?
दवासावे  शुष्क धुक्यात
गुप्त अश्रु ढाळतो आहे !
गार गार वाऱ्याने देह
 सारा थिजला आहे
पानगळीतच कुठेतरी
वसंत हि फुलला आहे
गुलाबी लाली गाली देवून
शिशिर शृंगारात दंगला आहे
विकासिनी !!

विडंबना !! by Vikasini Chavan on Thursday, December 1, 2011 at 5:02pm

विडंबना !!

by Vikasini Chavan on Thursday, December 1, 2011 at 5:02pm
विडंबना !!
मला कळतच नाही हे लोक
देवळात जावून काय मागतात ?
माणसातील माणुसकीला जाळून
देवळात जावून श्राद्ध करतात
माणुसकीच्या नरडीचा घोट घेवून
देवळात चपला काढायला का जातात ?
माणुसकीचा  क्रूर बळी घेवून
देवासमोर उभे कसे राहू शकतात ?
मला कळतच नाही हे लोक
देवाशी खोट कस  बोलतात ?
हृदय गहाण ठेवून देवाच्या
चरणी दंडवत कसे घालतात ?
एक गुन्हा लपवायला शंभर
गुन्ह्याचा वाली कसे होतात ?
देव यांना बघून हसत असतो तरी
देवाकडे बघून हे फिदीफिदी कसे हसतात ?
विकासिनी !!

मी !! by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 5:20pm

मी !!

by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 5:20pm
मी !!
मनातल्या  मनात  मी
तुझ्या स्मृती स्मरतो आहे
मनातल्या मनात मी
तुझ्यावर प्रीत करतो आहे
मनातल्या मनात मी
तुझी मुर्त निखरतो आहे
मनातल्या मनात मी
तुला स्वप्नात पाहतो आहे
मनातल्या मनात मी
तुझ्यासाठी झुरतो आहे
मनातल्या मनात मी
मनाचे श्लोक म्हणतो आहे
विकासिनी !!



मन !! by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 1:14pm

मन !!

by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 1:14pm
मन !!
मन तरंग बदली हरघडी
मन विहंग होई हरघडी
मन दबंग होई हरघडी
मन रंगात रंगी हरघडी  !

मन तुडुंब भरते कधीतरी
मन उडून जाई कधीतरी
मन फुलारून येई कधीतरी
मन ओलावून जाई कधीतरी  !

मन तरंगात गाई कधीतरी
मन रंग बदले घडी घडी
शामेलीयन सरड्यापरी
कॅलीदिओस्कोपच्या रंगापरी !
विकासिनी !!


भ्रमर !! by Vikasini Chavan on Thursday, November 17, 2011 at 9:34am

भ्रमर !!

by Vikasini Chavan on Thursday, November 17, 2011 at 9:34am
भ्रमर !!
अबोल भावनांचा प्राजक्त
अजून मनीच दरवळत आहे
गंध मंद गोड आठवणींचा
अजून मनीच बागडत आहे
स्वप्नांची साखरझोपीत
अजून झोपी गेलाय
आठवणींच्या बागेत भ्रमर
अजून गाणी गातोय
पहाटवारा शीतल अंगावर
अजून  शहरे आणतोय
स्वप्नांना जाग येण्यापुर्वीच
भ्रमर कैद मिठीत झालाय
दवासवे मधु सुधारस हि प्यालाय
विकासिनी !!

केकावली !! by Vikasini Chavan on Sunday, November 13, 2011 at 2:49pm

केकावली !!

by Vikasini Chavan on Sunday, November 13, 2011 at 2:49pm
केकावली !!
 राम अन रहीम होते
सुखात आपापल्या घरी
ओरडून आरत्या अन
 कळवळून अजाण
काय मागत होते हे
 भगवंता रस्त्यावरी ?
भेटला का राम त्यांना
 अन रहीम दर्ग्यावरी ?
माणुसकीच्या किंकाळ्यांनी
 सर्द झाली हि माणुसकी
खरेच का हे भक्त असती
 जो तो येथे आहे सवाली ??
झोळ्या आपल्या भरण्यासाठी
 धर्माची केली का गाठोडी  !!
विकासिनी !!