वाजले कि बारा !!
by Vikasini Chavan on Thursday, August 11, 2011 at 1:23pm
स्वयंपाक करता करता
भांडी घासता घासता
बाई येळ लई झाला,
आता जावू कशी कामाला ??
आता वाजले का बारा?
आता वाजलेच कि बारा ??
धावता धावता धावता
बस पकडता पडता
ट्रेन पकडताना सुटली
बाई येळ लई झाला
आता वाजलेच कि बारा ,
आता जावू कशी कामाला ??
ट्रराफिक जॅम रोजच,
ट्रेन रोजच लेटच लेट
बी एम सी , रेल्वे म्हणते
आम्ही नाही जबाबदार !!
धावत फास्ट ट्रेन पकडून
आता जावू कशी कामाला ?
आता येळ लई झाला ,
आता वाजले कि बारा !
हझेरी लावता लावता,
हाल जीवाचे तीन तेरा
साहेब म्हणतो बाई
किती उशीर हा झाला ??
आता जावा तुम्ही घरी
आता वाजले कि बारा !!
उशीर झाला म्हणुनी
सायबांनी दिला ओवर टाइम !
देतो म्हणाल पगार बी ज्यादा,
आता वाजले कि बारा
ओवर टाइम करता करता,
रात्रीचे वाजले बारा
आता जावू कशी घरी
आता वाजलेच कि बारा !
बाराचेच असे झाले तीन तेरा
येळेचा झाला इस्कुट सारा
आता जावू कशी उद्या कामाला ?,
..झाले संसाराचेच तीन तेरा !!
नवऱ्याला काय सांगू उशीर कसा झाला ??
आता माझेच वाजले साडे बारा !!
आता जावू कशी घरी ,
आता वाजले कि बारा बारा !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment