Sunday 21 August 2011

पावसाळी अधिवेशन !! by Vikasini Chavan on Sunday, August 21, 2011 at 10:36pm

पावसाळी अधिवेशन !!

by Vikasini Chavan on Sunday, August 21, 2011 at 10:36pm
पावसाळी अधिवेशन !!
नेहमीप्रमाणेच वाजले पावसाळी अधिवेशनचे सूप
कित्तेक पावसाळे पहिले असतील नाही भेटले तूप
अकलेच्या तारांकित प्रश्नांचे तोडले अकलेचे तारे
वाहू लागले आत्ता कुठे लोकपाल  बिलाचे वारे
एकाचे हि उत्तर धड नाही नुसतेच प्रश्न तारांकित
भेटेल का  पुढ्यार्यांची प्रत कोठे  छाय्यांकित ?
अधिवेशने गाजवण्याचा हक्क त्यांचा वारसा
कधी धूळफेक ,कधी चिखलफेक,
कधी दगडफेक ,कधी च्प्पला फेक,
कधी मोबाइल फेक,कधी माईक फेक,
कधी खुर्च्याफेक तर कधी बहिष्कार चहापानाचा !
द्या एकेक ओढून कानाखाली यांच्या
अधिवेशनाचा करती नुसताच  तमाशा !
शुन्य प्रहारात मग होती चर्चा अफाट
डाव्या उजव्यांच्या झटापटीत मग
चर्चेचा नुसताच रिकामा काथ्याकुट
चर्चेचे विषय बाष्कळ म्हणती अजेंडा त्याला
शून्य प्रहारातल्या चर्चेचे निष्पन्न देखील शून्य
चर्चा करणारे डावे समजती स्वतःला धन्य धन्य !
सर्वसामान्यांच्या पैशाची  नुस्तीच आशी वाट
सर्वसामन्यांच्या पैशावर यांचा वैयक्तीत थाट !
लालदिव्यांच्या गाड्यांना कन्यादानाचा पाट
चर्चेचे  विषय नुसतेच भ्रष्टाचार ,आदर्श घोटाळे
चर्चा करता करता फिरती आदर्शांचे  हि डोळे
महागाईच्या प्रश्नावर नुसताच गदारोळ
पेट्रोल डीझेल ग्यास मध्ये करतात अंघोळ
सर्वसामान्यानांचे  प्रश्न गेले तेल लावत !
सकस आहाराच्या चर्चेत खाउ घालतील
नुसतेच कडधान्यांचे किडे आणि आळ्या
त्यानच्या पोरांना मात्र केक चोकलेट गोळ्या
आणि कुपोषणाला ठरवतील डॉक्टरला
आणि आरोग्य खात्याला जबाबदार !
पुन्हा सूप वाजवून होते अधिवेशनाची सांगता
सर्वसामान्यांचा सुपात मात्र महागाईची घन्टा !!
पावसाळ्या प्रमाणेच गेले पावसाळी आधिवेशन पाण्यात
त्यांच्या बापच काय जातं सर्वसामान्यांच  जळत ?
दाबा यांची नरडी ,बांधा यांच्या तिरड्या
उचलून फेका एकेकांना नेवून स्मशानात जाळा
सर्वासामान्यांनो यांना आत्ता ढेकनासारखे चिरडा !!
विकासिनी !!

No comments:

Post a Comment