वास्तव !!
by Vikasini Chavan on Monday, October 10, 2011 at 1:05pm
वास्तवाच्या ओझ्याचे
सारेच इथे हमाल
विस्मृतीच्या पडद्याआडचे
सारेच इथे गुलाम
वास्तवता कधी नसतेच
अशी मुळी अवास्तव
विस्तवाचे चटके
नसतात कधी अवास्तव
जीवनाचे सार वास्तव
सरणातला अंगार वास्तव
विस्तावासारखे लालबुंद वास्तव
सूर्योदय अन सूर्यास्त वास्तव
वास्तव झेलला तो जगाला
हमाल होवुनी वास्तव झेलला !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment