मिलनात या !!
by Vikasini Chavan on Saturday, October 8, 2011 at 10:24am
जीवनाचे स्तोत्र लिहिले
मनकवड्या मिठीत
मन सर्द चिंब भिजले
हुळ हुळ या गात्रात
ओठ मिठीत रुजले
शब्दप्राण एक झाले
कंठात सूरप्राण दाटले
गीत तुझ्या हृदयीचे
गात्रात गोड थिजले !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment