अहिल्या !!
by Vikasini Chavan on Wednesday, August 24, 2011 at 8:35am
वाट तुझी पाहून अहिल्या थकली
वाटेतच तिच्या अश्रूंची शिळा झाली
जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे
शिळेतले आयुष्य शिळेलाच कळे
ध्यास रामाचा धरून का बसली ?
शाप कुणाचा वाटेत घेवून बसली ?
वाट पाहण्या पलीकडे काय करू शकली ?
रामाला हि तिची दया काही नाही आली !
देव होता पण त्याला कळून नाही चुकली
वाट पाहून तुझी हि अहिल्या थकली !!
विकासिनी !!
No comments:
Post a Comment