Saturday 20 August 2011

आई !! by Vikasini Chavan on Saturday, July 30, 2011 at 11:44am 1. आई !!

आई !!

by Vikasini Chavan on Saturday, July 30, 2011 at 11:44am
  1. आई !!
बाहुलीशी खेळते तेव्हांच ती आई होते
आई होण्यासाठी जन्म देण्याची गरज नसते
आई एक वेदना आहे, आई एक संवेदना आहे
वांझोटी हि आई आहे, सांभाळणारी हि आई आहे
याशोधाही महान आहे ,मानलेली हि आई आहे
आई नुसतेच नाते नाही, आई प्रेमाची नाळ आहे
आईच काळीज आईलाच माहित आहे
काळीज तिचे कितीही  दुखवले  तरी
विचारेल लागले का बाळा तुला ??
आई होणे खरच फार कठीण आहे
स्वामि तिन्ही जगाचा आईविना भिकारीच आहे !!
विकासिनी !!

No comments:

Post a Comment