Saturday 20 August 2011

बिनधास्त बोला म्हणे !! by Vikasini Chavan on Tuesday, August 9, 2011 at 12:21pm

बिनधास्त बोला म्हणे !!

by Vikasini Chavan on Tuesday, August 9, 2011 at 12:21pm
बिनधास्त बोला म्हणे !!
बिनधास्त बोला म्हणताय इथे
स्त्रीला स्वातंत्र्य आहे काय इथे ??
त्या स्वातंत्र्याचा  वापर केला
तर स्वैराचार म्हणतात इथे
आचार काय विचार काय
तिचे काहीच स्थान नाही इथे
बोलली  खरच तर सगळेच
संसार उधळून पडतील इथे
गप्प  बसतेय सहन करतेय
म्हणून कुठे संसार चाललेत इथे
इवल्या लेकरांकडे बघून
बिचारी सार सहन करते इथे
बोललीच  काही तर सारी
सहनशक्ती निघून जाईल इथे
बांध मनाचे फुटून जातील इथे
गप्पच बसतेय लेकरासाठी
तिला बोलालायला लावू नका इथे
म्हणूनच तिला माझी माय म्हणतात इथे !!
विकासिनी !!

No comments:

Post a Comment