Saturday 20 August 2011

चंद्रावर जाण्यास हवी एकच शिडी !! by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 10:06pm

चंद्रावर जाण्यास हवी एकच शिडी !!

by Vikasini Chavan on Sunday, July 17, 2011 at 10:06pm
चंद्रावर जाण्यास हवी एकच शिडी
चांदण्यांच्या नक्षीची हवी एक साडी
तारकांच्या दागिन्याला हवी रुप्याची खडी
फेरफटका मारायला हवी सशाची गाडी
अंगावर ल्यायला हवी ढगांच्या दुलईची घडी
चांदोबाचा चेंडू खेळण्यास हवे तारकांचे सवंगडी
निळ्याशार आकाशात हवी रुपेरी ढगांची लडी
पाठशिवणीचा खेळ खेळाया तुझी माझी जोडी
गोंजारून त्या सशाला द्यावी एक छडी
रात्र लवकर संपवायला  मारुया एकच उडी
 विकासिनी  .... !!

No comments:

Post a Comment