Saturday 20 August 2011

कायदा by Vikasini Chavan on Wednesday, July 13, 2011 at 10:44pm

कायदा

by Vikasini Chavan on Wednesday, July 13, 2011 at 10:44pm
तसं माझ गाव  फार काही मोठा नव्हत
बस आमच्या गावी एकही पोलीस  स्टेशन नव्हत
काय होता कायदा आणि काय होता कानून
याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो
तेवढच एक काय ते  आमच्या
अडाणी पणाच  लक्षण होत
 काय होती भारताची घटना हे
आम्हाला  काय  ठावूक होत ??
कायद्याची गरज पडली तेव्हा
कळल कि आपण किती अडाणी होतो ??
शिक्षण घेवून डॉक्टर झालो पण
कायद्याच्या भाषेत अंगठा छापच  होतो
कायदा शिकला तर शिपाई हि सर न्यायाधीश  होतो
कायदा समजला तेव्हा समजलं कि
चोर पोलीसांच कस साट-लोट असत
पोलीस  स्टेशनच  चोरांच माहेरघर असत
भ्रष्टाचार खात  हि त्याला व्यर्ज नसत
पोत्यांनी अन गोण्यानी मिळाल  तर
भ्रष्टाचार  खात हि खातच असत
कायद्याच बोललात तर कायदा हि भ्रष्ट असतो
कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी असतो
अट्टल गुंन्हेगार त्याला  हिंग लावून पुसत नसतो
सद रक्षणाय खल निग्रहणाय  कायदा
खल रक्षणाय सद निग्रहणाय कसा होतो  !!!
 विकासिनी  !!

No comments:

Post a Comment