Sunday 25 December 2011

वावटळ !! by Vikasini Chavan on Thursday, December 22, 2011 at 9:56am

वावटळ !!

by Vikasini Chavan on Thursday, December 22, 2011 at 9:56am
वावटळ !!
तुझ्या प्रेमाच्या वावटळीत
गरगर मी आसमंत फिरले
पाला पाचोळ्या सारखी
तुझ्यासोबतच फिरले
नदी नाले डोंगर दर्या
सारेसारे  एकच वाटले
तुझ्या वावटळीत मी
सुख् दुख सारेअनुभवले
पाला पाचोळ्या सारखी
 मी हेलपाटत राहिले
झंझावात होता असा
 की घरच न उरले
आकाशाचा छप्पर करून
भोवऱ्यासारखी भीरभीरले
तुझ्या वावटळीत मीच
वावटळ होवून उरले  !!
विकासिनी !!


नक्षत्रगीत !! by Vikasini Chavan on Sunday, December 18, 2011 at 11:33pm

नक्षत्रगीत !!

by Vikasini Chavan on Sunday, December 18, 2011 at 11:33pm
नक्षत्रगीत !!
सरला तो चांद पुनवेचा
उरली ती शुक्राची चांदणी
भिनला तो पहाटवारा चंद्राला
भुलली ती चांदणी शुक्राची
 उरली ती प्रीत नक्षत्रांची
झुरला तो  ध्रुव नक्षत्रतारा
चांदव फुलांचा चांदव झुला
चांदव ताऱ्यांचा नक्षत्रदिवा
सरल्या रात्रीचा सरला चांदवा
मंत्रमुग्ध मखमली हा गारवा 
ती धुक्याची शाल दाट झाली
नयनी निशेचे अंजन घालून आली
प्रीतरसात शुक्राची चांदणी न्हावून आली
उषकालचे  सिंदूर लेवून आली
नक्षत्रगीत गात बघ आली
विकासिनी !!

यल्गार !! by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am

यल्गार !!

by Vikasini Chavan on Sunday, December 11, 2011 at 12:27am
यल्गार !!
चिरडून माणुसकीचे हृदय
दगडात शोधिती दगड हे देव
फासून काळिमा माणुसकीला
दगडास फासती शेंदूर अन तेल
शिकून झाले अतिशहाणे पण
ठेवून माणुसकीला या गहाण
ठेचली मायबाप, बंधुभगिनी
सारखी नाती हि लाख अनमोल
सोकावला काळ ऐकू न येई
माणूसकितला आक्रोश काही
रात्रीस ऐकू येई हि बनावी कोल्हेकुई
कोल्ह्यास या आता पारधी विचारत नाही
बुजागावण्यास आता पारधी घाबरत नाही
यल्गार करुनी आता कोणी उठत नाही
जो तो आता आपली कातडी सांभाळून राही
विकासिनी !!

मशाल !! by Vikasini Chavan on Saturday, December 10, 2011 at 7:28pm

मशाल !!

by Vikasini Chavan on Saturday, December 10, 2011 at 7:28pm
मशाल !!

विझल्या कितीक पुन्हा पेटवा त्या मशाली
जाहली भ्रष्ट हि सारी सरंजामशाही !

भ्रष्टला जर यम तर पहा काय होईल
देव भ्रष्टला तर कोणी न जन्मास येईल !

दिव्याच्या वातीला तेल किती जाळाल रोज
सारणात घातली ती लाकडे किती रोज !

उकरून गडे मुडदे काढाल किती रोज
काफिर दुनियेत देवाला गाढाल किती रोज !

विकासिनी !!


भ्रमिष्ट !! by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am

भ्रमिष्ट !!

by Vikasini Chavan on Friday, December 9, 2011 at 9:38am
भ्रमिष्ट !!
विखुरलेल्या स्वप्नांच्या अस्थी
रानोमाळ वेचत मी आलो
स्मृतींच्या राखेत रानोमाळ
स्वतःला शोधत मी आलो
विखुरलेल्या  सांगाड्यात
आत्म्याला मी शोधत आलो
सारे वेचता वेचता रानोमाळ
उगीच भ्रमिष्ट मी झालो !!
विकासिनी !!

Sunday 4 December 2011

रानपाखरू !! by Vikasini Chavan on Wednesday, November 30, 2011 at 8:58am

रानपाखरू !!

by Vikasini Chavan on Wednesday, November 30, 2011 at 8:58am
रानपाखरू !!
आकाशातल पाखरू
उंच आकाशी उडे कसं
पंखावर आभाळ झेली कसं
पाखरू होवुनी पाहूया गडे
प्रेम मुक्या पाखराचे समजण्या
पंखाची भाषा शिका गडे
रानपाखारा शोधण्या
रानीवनी फिरुनी
मनपाखरू होवुनी
उडू द्या गडे 
विकासिनी !!

मन !! by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 6:25pm

मन !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 6:25pm
 मन !!
मन गुंता रे गुंता
सतराशे साठ विचारांचा
मन चिंत्याचा रे गुंता
सतराशे साठ विषयांचा
मन उमले उमले
जशी कमळाची दले
मन अवीट अवीट
जसा मधाच ग बोट
मन खवीट  खवीट
येई मनास झीट
मन कृष्णाच शिवार
तेथे राधा प्रितीच पिक
जस कान्हाच्या डोक्यावर
शोभते ग मोरपीस एक !!
विकासिनी !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 12:44pm सोनं !!

by Vikasini Chavan on Sunday, December 4, 2011 at 12:44pm
सोनं !!
आली आली सुप्रभातीच
माझ्या घरी सूर्याची ग उन्हं
पिकवूनी गेली माझ्या
घरादारा मधी ग सोनं
सूर्यदेवांन साऱ्या घरादाराला
सोन्यानी न्हावू घातलं
सुर्यादेवाच्या जादून
सोन्याच शिवार फुलल
सोनं सोनं काय म्हणता
खूप महाग झालं ??
घेवून जा माझ्या घरातून
घर सोन्यान न्हालं
सुर्यादेवा तूझं सोनं
माझ्या मनात माईना
तुझ्या सोन्याचा लखलखाट
काही केल्या ग जाईना
कशाला फुका शिनगार
कशाला पाहू  मी आईना
हृदयातल्या प्रीतीच्या पुढे 
वरमला बघ आईना
सोनं सोनं सोनं सोनं
सोनं रातीला घावल
रातीच्या अंधारात
सोनं मातीमोल झालं !!
विकासिनी !!


lime light !! by Vikasini Chavan on Saturday, December 3, 2011 at 10:31am

lime light !!

by Vikasini Chavan on Saturday, December 3, 2011 at 10:31am
The foggy ...chilled.........
.........effervescence....
   .........enchanting ..
....u n me
....to be ....
....dear... n ........near
......n  feel closer... n ..closer ...
the chant ...of the
...full moon ...night  ........
with ........flurosant ..twilight ......
flurishes......heavenly .......delight
revolving   u..  n  me... in the
cherished ...........
...limelight
............limelight
...................n ..the limelight  ....!!
vikasini !!

अडगळ!! by Vikasini Chavan on Friday, December 2, 2011 at 10:08am

अडगळ!!

by Vikasini Chavan on Friday, December 2, 2011 at 10:08am
अडगळ!!
अडगळीतले फोटो चाळताना
आठवण तुझी झाली
मनांच्या कॅमेर्याताला
मग रोल  उलगडून जाई
दिवस असे भूर्रकन
वार्यासारखे उडून गेलेले
क्षणातच डोळ्यासमोरून
ते क्षण चित्रित झालेले
आठवणींनी मग मनात
काहूर माजवलेले
दिवसाची रात्र अन
रात्रीचा दिवस करणारे
बेधुंद मन हेलावून टाकणारे
आज का मग अडगळीत असे पडले ?
पुन्हा तो चित्रपट पाहता येणारच नाही
अक्शन रीप्लेय होणारच  नाही
आठवणीची अडगळ साचतच जाईल
अडगळीतल्या फोटो सारखी !!
तरीपण झेलतच राहील
सुख दुखाच्या क्षणांना
आडगळीसारखीच !!
विकासिनी!!



गर्दीतला चेहरा !! by Vikasini Chavan on Friday, November 25, 2011 at 12:35pm

गर्दीतला चेहरा !!

by Vikasini Chavan on Friday, November 25, 2011 at 12:35pm
गर्दीतला चेहरा !!
अनोळखी गर्दीतला
ओळखीचा चेहरा
कधी हुरहूर लावणारा
कधी काहूर माजवणारा
अशाश्वत असा पण
 शाश्वत वाटणारा
काधी सैरभैर धावणारा
कधी एकाकी चालणारा
आपला कुणी शोधणारा
आपल्या परीने चालणारा
क्षणात हरवून जाणारा
सतत शोधात राहणारा
मनाची अधीरता वाढवणारा
गर्दीतला अनोळखी चेहरा !!
विकासिनी !!


शिशिर !! by Vikasini Chavan on Tuesday, November 22, 2011 at 3:52pm

शिशिर !!

by Vikasini Chavan on Tuesday, November 22, 2011 at 3:52pm
शिशिर !!
शिशिराच्या प्राक्तनी
पानगळच का आहे ?
दवासावे  शुष्क धुक्यात
गुप्त अश्रु ढाळतो आहे !
गार गार वाऱ्याने देह
 सारा थिजला आहे
पानगळीतच कुठेतरी
वसंत हि फुलला आहे
गुलाबी लाली गाली देवून
शिशिर शृंगारात दंगला आहे
विकासिनी !!

विडंबना !! by Vikasini Chavan on Thursday, December 1, 2011 at 5:02pm

विडंबना !!

by Vikasini Chavan on Thursday, December 1, 2011 at 5:02pm
विडंबना !!
मला कळतच नाही हे लोक
देवळात जावून काय मागतात ?
माणसातील माणुसकीला जाळून
देवळात जावून श्राद्ध करतात
माणुसकीच्या नरडीचा घोट घेवून
देवळात चपला काढायला का जातात ?
माणुसकीचा  क्रूर बळी घेवून
देवासमोर उभे कसे राहू शकतात ?
मला कळतच नाही हे लोक
देवाशी खोट कस  बोलतात ?
हृदय गहाण ठेवून देवाच्या
चरणी दंडवत कसे घालतात ?
एक गुन्हा लपवायला शंभर
गुन्ह्याचा वाली कसे होतात ?
देव यांना बघून हसत असतो तरी
देवाकडे बघून हे फिदीफिदी कसे हसतात ?
विकासिनी !!

मी !! by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 5:20pm

मी !!

by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 5:20pm
मी !!
मनातल्या  मनात  मी
तुझ्या स्मृती स्मरतो आहे
मनातल्या मनात मी
तुझ्यावर प्रीत करतो आहे
मनातल्या मनात मी
तुझी मुर्त निखरतो आहे
मनातल्या मनात मी
तुला स्वप्नात पाहतो आहे
मनातल्या मनात मी
तुझ्यासाठी झुरतो आहे
मनातल्या मनात मी
मनाचे श्लोक म्हणतो आहे
विकासिनी !!



मन !! by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 1:14pm

मन !!

by Vikasini Chavan on Saturday, November 19, 2011 at 1:14pm
मन !!
मन तरंग बदली हरघडी
मन विहंग होई हरघडी
मन दबंग होई हरघडी
मन रंगात रंगी हरघडी  !

मन तुडुंब भरते कधीतरी
मन उडून जाई कधीतरी
मन फुलारून येई कधीतरी
मन ओलावून जाई कधीतरी  !

मन तरंगात गाई कधीतरी
मन रंग बदले घडी घडी
शामेलीयन सरड्यापरी
कॅलीदिओस्कोपच्या रंगापरी !
विकासिनी !!


भ्रमर !! by Vikasini Chavan on Thursday, November 17, 2011 at 9:34am

भ्रमर !!

by Vikasini Chavan on Thursday, November 17, 2011 at 9:34am
भ्रमर !!
अबोल भावनांचा प्राजक्त
अजून मनीच दरवळत आहे
गंध मंद गोड आठवणींचा
अजून मनीच बागडत आहे
स्वप्नांची साखरझोपीत
अजून झोपी गेलाय
आठवणींच्या बागेत भ्रमर
अजून गाणी गातोय
पहाटवारा शीतल अंगावर
अजून  शहरे आणतोय
स्वप्नांना जाग येण्यापुर्वीच
भ्रमर कैद मिठीत झालाय
दवासवे मधु सुधारस हि प्यालाय
विकासिनी !!

केकावली !! by Vikasini Chavan on Sunday, November 13, 2011 at 2:49pm

केकावली !!

by Vikasini Chavan on Sunday, November 13, 2011 at 2:49pm
केकावली !!
 राम अन रहीम होते
सुखात आपापल्या घरी
ओरडून आरत्या अन
 कळवळून अजाण
काय मागत होते हे
 भगवंता रस्त्यावरी ?
भेटला का राम त्यांना
 अन रहीम दर्ग्यावरी ?
माणुसकीच्या किंकाळ्यांनी
 सर्द झाली हि माणुसकी
खरेच का हे भक्त असती
 जो तो येथे आहे सवाली ??
झोळ्या आपल्या भरण्यासाठी
 धर्माची केली का गाठोडी  !!
विकासिनी !!

Tuesday 15 November 2011

वाट by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 7:43pm

वाट

by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 7:43pm
वाट
वाटांनाही वाटते वहीवाटांनी चालत रहावे
चुकले तर पळवाटांना  विचारावे
हरवले तर आडवाट होवून रहावे
वाट संपली तर तिथेच थांबावे
वाटांनाही वाटले कधी मैत्री करावे
मैत्रीचा कधी चौक होवून रहावे
वाटसरुंशी हितगुज करावे
पण वाटचाल काही थांबत नाही
वाटेवरच्या वळणानं नवीन वळण द्यावे
वहीवाट सोडून चालत रहावे
वाटसरुन्ना  वाट दाखवत रहावे
वाट चुकलेल्याना वाटेवर आणावे
विकासिनी !!


मधु चंद्र!! by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 8:50am

मधु चंद्र!!

by Vikasini Chavan on Saturday, November 12, 2011 at 8:50am
मधु चंद्र!!
चंद्रमौळी झोपडीतून माझ्या
पहिल्या तुझ्या अनंत कला
रोज तुझा नवा मधु चंद्र
अन रोज नव्या चांदण्या
विकासिनी !!

दिव्याज्योती ! by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 7:36pm

दिव्याज्योती !

by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 7:36pm
मी दिवा अन
तू ज्योती
मधुर मिलनात

होती दिव्याज्योती !
vikasini !!

अंजली !! by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 9:44am

अंजली !!

by Vikasini Chavan on Friday, November 11, 2011 at 9:44am
अंजली !!
प्रेमसागरात या
अर्पुनी अश्रुंचे अर्ध्य
वाट पहिली मी
होईपर्यंत सुप्रभात
वाटेवर तुझ्या कोमल
प्रीतीसुमने हि कोमेजली
हाती फक्त उरली
निर्माल्याची पुष्पांजली !!
विकासिनी !!

स्पर्श हळव्या मनाचे !! by Vikasini Chavan on Thursday, November 10, 2011 at 11:55am

स्पर्श हळव्या मनाचे !!

by Vikasini Chavan on Thursday, November 10, 2011 at 11:55am
 स्पर्श हळव्या मनाचे !!
चंद्रमौळी जरी असले
झोपडे आपले असावे
ठीगळाचे जोड असले
तरी उबदार असावे
रेशमी जरी  नसले
धागे जोडलेले असावेत
विणीत धाग्यांच्या फक्त
तुझे माझे नाव असावे
तुझ्या हतात माझे
आणि माझ्या हातात
तुझे हृदय असावे
तुझ्या माझ्या हृदयात
स्पर्श हळव्या मनाचे असावेत !!
विकासिनी !!

हवन !! by Vikasini Chavan on Monday, November 7, 2011 at 4:31pm

हवन !!

by Vikasini Chavan on Monday, November 7, 2011 at 4:31pm
हवन !!
विरहात तुझ्या
वृक्ष्यवल्लीना कवटाळले
अश्रू सारे माझे
नद्यानाल्यानी वाहिले
घोर जीवाचा
काळजात माझ्या राहिले
प्रीतीसागरात या
विरहगीत ज्वालामुखी झाले
त्या ज्वालामुखीत
माझ्या हृदयाचे हवन झाले
विकासिनी !!

दिवाळी !! by Vikasini Chavan on Friday, October 28, 2011 at 2:44pm

दिवाळी !!

by Vikasini Chavan on Friday, October 28, 2011 at 2:44pm
दिवाळी !!
थोडंसं श्वासात  साठवू तर दे
मग हवंतर जा
थोडंसं मनात आठवू तर दे
मग हवंतर जा
थोडासा मोहक स्पर्श मोहरू तर दे
मग हवंतर जा
थोडसं मनपाखरू  सावरू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी प्रीतफुले  फुलू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी प्रीतरीत मोडू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी झिंग मनाला येवू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी पेंग मनाला येवू तर दे
मग हवंतर जा
थोडीशी दिवाळी साजरी तर करू दे
मग हवं तर जा
विकासिनी !!

शुभ दीपावली !! by Vikasini Chavan on Friday, October 21, 2011 at 9:47pm

शुभ दीपावली !!

by Vikasini Chavan on Friday, October 21, 2011 at 9:47pm
शुभ दीपावली !!
उजळून लक्षकोटी दिवे
नक्षत्र तारकांचे नभी
चांदोबा उभा गगनी
आकाशदिवा बनुनी
नेत्र दीपक लावण्य
पाहता नक्षत्र दीपावली
उजळून आल्या जीवनी
प्राण ज्योतींच्या मशाली !!
शुभ दीपावली !!
विकासिनी !!


कौन?? by Vikasini Chavan on Tuesday, October 18, 2011 at 1:33pm

कौन??

by Vikasini Chavan on Tuesday, October 18, 2011 at 1:33pm
कौन??
टूटी हुई कश्ती का साहिल कौन बनेगा ?
बिखरे हुए रास्तों का राही कौन बनेगा ?
अंजान डगर की पतवार कौन संभालेगा ?
उभरते हुवे तूफान का फानूस कौन बनेगा ?
बुज़ते हुवे दियेकी रोशनी कौन बनेगा ?
शूलके अंगारकी राख कौन बनेगा ?
तपते हुवे अंगारोपर कौन पागल चलेगा ?
गिरते हुवे बिजली की मुस्कराहट कौन बनेगा ?
विकासिनी !!

काकड आरती !! by Vikasini Chavan on Monday, October 17, 2011 at 3:54pm

काकड आरती !!

by Vikasini Chavan on Monday, October 17, 2011 at 3:54pm
काकड आरती !!
धुरात या वासनांच्या
श्वास मनीचा कोंडला
वाहत आली घाण पाहुनी
चित्त प्राण घोटला
घृणा कशी करावी
या निर्लज्ज पामरांची
वासनेच्या अंधारात
जो तो का बरबटलेला ?
मुक्ती कशी व्हावी देवा ?
कसा मिळावा मोक्ष यांना ?
तुझ्या दारापर्यंत यायची
नाही या निर्लाज्जांची लायकी
बरे झाले तू दिसत नाहीस कोणाला
तुला हे पाहून झोप कशी लागली ?
तुला जागवण्या साठी  हे देवा
गावू कोणती मी काकडआरती ??
विकासिनी !!

Wednesday 12 October 2011

अपने ?? by Vikasini Chavan on Wednesday, October 12, 2011 at 11:19am

अपने ??

by Vikasini Chavan on Wednesday, October 12, 2011 at 11:19am
गैरोंसे प्यार किया हमने
प्यार पे हमारे अपने ही जले
काश समज लेते प्यारको मेरे अपने
गैरोंके मैफिल मैं हम न आते
जिनके लिये लूटा दी सारी जिंदगी
वो अपने कभी हमें समज न सके
रोशनी चिराग की बुज़ानी पड़ी
हमें अपनोके रौशनी के लिए
राह उजियारी होते हुए भी क्यूँ
रोशनि से लड बैठे अपनोंके लिए
गैरोसे प्यार किया हमने
प्यार पे हमारे अपने ही जले !
गैर तो गैर थे पर अपनोंकी
मैफिल में  हम बेगाने थे
अपने इतने खुदगर्ज निकले
हमसे खून रिश्ते भी भूल बैठे
वो तो अच्छा हुवा खुदा का शुक्रिया
के हम गैर के मैफिल मैं थे
वर्ना हमे पता न चलता कभी
अपने हमारे क्यूँ खुदगर्ज निकले ?
विकासिनी !!

पैंजण !! by Vikasini Chavan on Saturday, September 24, 2011 at 3:51pm

पैंजण !!

by Vikasini Chavan on Saturday, September 24, 2011 at 3:51pm
पैंजण !!
निघाले होते पैंजण बनायला
पायातील बेडीच बनून गेले
निघाले होते मुक्त व्हायला
पण मी आसक्त होवून गेले
निघाले होते सारे द्यायला
पण मी माझीच न उरले
निघाले होते तुझी व्हायला
वाटच विसरून गेले वाटेत
विकासिनी !!

जख्मे जज्बात !! by Vikasini Chavan on Sunday, September 25, 2011 at 3:34pm

जख्मे जज्बात !!

by Vikasini Chavan on Sunday, September 25, 2011 at 3:34pm
जख्मे जज्बात !!

जख्मे जज्बात  इतने
 क्यूँ गहरे होते है ?
वक्त के गुज़रनेसे और भी
 क्यूँ संगीन होते है ?
जख्म पुराने जितने उतने
 क्यूँ  दर्दीले होते है ?
चीर के सिने मैं इतने
 क्यूँ चुभ से जाते है ?
निशान न छोड़ते हुये भी
 क्यूँ दिलमें रह जाते है ?
वक्त हर एक घाव भर देता है
 जख्मे जज्बात क्यूँ नासूर बन जाते है ?
विकासिनी !!


मिलनात या !! by Vikasini Chavan on Saturday, October 8, 2011 at 10:24am

मिलनात या !!

by Vikasini Chavan on Saturday, October 8, 2011 at 10:24am
मधुर मिलनात या
जीवनाचे स्तोत्र लिहिले
मनकवड्या मिठीत
मन सर्द चिंब भिजले
हुळ हुळ  या गात्रात
ओठ मिठीत रुजले
शब्दप्राण एक झाले
कंठात सूरप्राण दाटले
गीत तुझ्या हृदयीचे
गात्रात  गोड थिजले !!
विकासिनी !!

भ्रमर ! by Vikasini Chavan on Saturday, October 8, 2011 at 5:28pm

भ्रमर !

by Vikasini Chavan on Saturday, October 8, 2011 at 5:28pm
भ्रमर !
छळणाऱ्या काही क्षणाची
उत्तरे मिळतच नसतात
मिळणाऱ्या काही क्षणांचे
प्रश्न सतावत असतात
काय शोधायचे असते
ते  काही न समजताच
काहीतरी उगीच हाती पडते
हाती पडते ते नशीब असते
झेलाल ते हातात येते
हातात नाही येत जे काही
त्याचे गहन प्रश्न होतात
गुंत्यात या मग मन
आणखीनच गुंतून जाते
प्रश्नाचे जाळे असेच तयार होते
कमल दलात जसे भ्रमराचे होते !!
विकासिनी !!




वास्तव !! by Vikasini Chavan on Monday, October 10, 2011 at 1:05pm

वास्तव !!

by Vikasini Chavan on Monday, October 10, 2011 at 1:05pm
वास्तव !!
वास्तवाच्या ओझ्याचे
 सारेच इथे हमाल
विस्मृतीच्या पडद्याआडचे
 सारेच इथे गुलाम
वास्तवता  कधी नसतेच
अशी मुळी अवास्तव
विस्तवाचे चटके
नसतात कधी अवास्तव
जीवनाचे सार वास्तव
सरणातला  अंगार वास्तव
विस्तावासारखे लालबुंद वास्तव
सूर्योदय अन सूर्यास्त वास्तव
वास्तव झेलला तो जगाला
हमाल होवुनी वास्तव झेलला !!
विकासिनी !!

गुलकंद !! by Vikasini Chavan on Monday, October 3, 2011 at 12:23pm

गुलकंद !!

by Vikasini Chavan on Monday, October 3, 2011 at 12:23pm
   गुलकंद !!
गळून सुकलेल्या गुलाबपाकळीचा
 मी गुलकंद आहे
वेड्या तुझ्या कळीचा आगळाच
 मी वेडा छंद आहे
निष्पर्ण जरी तरी तुझ्याच झाडाच
 मी एक अंग आहे
सुकलेला जरी निर्माल्य आज
 माझ अंतरंग आहे
कालचाच गोड माझ्या भोवती
 हा मकरंद आहे !!
   विकासिनी !!

Monday 19 September 2011

VIKASINI !!

VIKASINI !!

VIKASINI !!
Antarmanacha thet vedh ghenari shakti mhanaje vikasini
manala ved lavate ti pan vikasini
manushyamadhye prembhav jagavate ti suddha vikasini
Manasana manasamaddhye ante ti hi vikasini
Vegalepan japnari hi pan vikasini
... FACEBOOK CHI MALIKA SUDDHA vikasini
Allad swabhavachi parpakva vicharachi sojwal vikasini
Amchi sarvanchi awadti vikasini
TEJASWI cheheryachi vikasini
BOLKI pan ABOL ashi vikasini

Kadhi kadhi shunyat harvun ka jat asel hi Hasari vikasini?.
 BY ATUL NIKUMBH!!

स्पर्श रेशमी !! by Vikasini Chavan on Wednesday, September 14, 2011 at 9:48am

स्पर्श रेशमी !!

by Vikasini Chavan on Wednesday, September 14, 2011 at 9:48am
रेशमी धागा !
अलवार हृदयाच्या रेशीम गाठी
खेचू नकोस अशा घाईने उगी
रेशीमगाठी ह्या घट्ट होतील उगी
अलवारच राहू दे ,थोडी थोडी ढील दे
भावबंध थोडेसे हे मोकळे  होवू दे
गारवा प्रीतीचा थोडा मनात राहू दे
श्वास हे थोडे गुलाबी  मुक्त राहू  दे
देहभान हे थोडेसे हरपून जावू दे
आठवणींत थोडेसे बेचैन  होवू दे
स्वप्नात थोडेसे हरवून जावू  दे
रेशमी धागा हा रेशमीच राहू दे !!
स्पर्श रेशमी हे रेशमीच राहू दे !!
विकासिनी !!

वीरान महफ़िल!! by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 2:12pm

वीरान महफ़िल!!

by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 2:12pm
वीरान महफ़िल!!
महफ़िल मैं दम घुटता है
वीरानिया हमें रास आई
फुलोसे ज्यादा
काटोंकी सेज ही पाई
महक फूलोंकी
हमें रास न आई
सुखी जब पत्तिया
तब बात ये समज आई
विकासिनी !!

गहराइ रिश्तोंकी !! by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 3:02pm

गहराइ रिश्तोंकी !!

by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 3:02pm
गहराइ रिश्तोंकी !!
यू  तो कैसे कैसे रिश्ते बनते है
और बना लेता है कैसे हर कोई
दिलके रिश्तोंकी गहराइया समज़ना
आम इन्सान के बस की बात नहीं
जख्म खाओगे दिलपे लाख
मगर दिल का जख्म समज़ना
हर किसीके बस  की बात नहीं
रंजिशे दिल समज़ना
हर किसीको आता नहीं
रिश्तों के इस बाज़ार मैं
दिल तनहा है हर वक्त
फिर भी हरदम धड़कना
इसकी आदत तो है नहीं
काफ़िर निगाहे भी
बोलती है बहोत कुछ
शब्दोसे बाया करने की
किसीको जरूरत तो है नहीं
विकासिनी!!

मदारी !! by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 4:01pm

मदारी !!

by Vikasini Chavan on Sunday, September 18, 2011 at 4:01pm
मदारी !!
होटोंपे जब लाली थी
तब जेब अपनी खाली थी
खामोश थी निगाहे भी
दिल मैं हर एक सवाली थी
पेट भी खाली था दिल की तरह
सर्द होटों की भी लाली थी
सारा जहाँ देखकर भी
अपनी निगाहे खाली थी
जीना हम चाहते थे मगर
जीने कि राह खाली थी
क्यूँ की चाभी अपने तकदीर की
किसी मदारी के हाथ थी
तमाशा तकदीर का देखना
बस हमारी तकदीर थी !१
विकासिनी !!

Monday 5 September 2011

पंचप्राण !! by Vikasini Chavan on Monday, September 5, 2011 at 10:32am

पंचप्राण !!

by Vikasini Chavan on Monday, September 5, 2011 at 10:32am
पंचप्राण !!
तू जवळ नसताना तूच असशीजवळी  रे
तू जवळ असताना हृदयात वसशी तूच रे
जवळ काय, दूर काय मी तुझे  हृदयच रे
साठवशील किती जीवाचे नाजूक पंचप्राण रे
आरशातील प्रतिमा नाही मी मनातील मूर्त रे
चेहरा माझा गवसणे तुला नाही शक्य रे
हृदय माझे तूच अन मी तुझी मुर्त रे
शोधिसी फुका जळि ,स्थळि ,कष्टी, पाषाणी रे
साठवतान तुला हृदयात हरवेल माझे मी पण रे
अनाहूत या भीतीने गतप्राण होई पंचप्राण रे !
 विकासिनी !!

गुरुदक्षिणा !! by Vikasini Chavan on Sunday, September 4, 2011 at 2:00am

गुरुदक्षिणा !!

by Vikasini Chavan on Sunday, September 4, 2011 at 2:00am
गुरुदक्षिणा !!
शिकून सावरून खूप मोठा झालो
पण आजही इतका मोठा नाही झालो
कि गुरूची गुरु दक्षिणा देवू शकेन
शिकवणी ची फी दिली होती पण
शिकवण त्यांची मोठी होती
एकलव्य नाही होवू शकलो
एक एवढीच खंत होती
पुस्तकी ज्ञानाने मोठा झालो
पण सामान्य ज्ञानाच्या शाळेत नाही गेलो
गुरुचे ऋण फेडण्यात आजही अयशस्वीच ठरलो !!
विकासिनी !!

नीलीछत्री वाले !! by Vikasini Chavan on Saturday, September 3, 2011 at 2:10pm

नीलीछत्री वाले !!

by Vikasini Chavan on Saturday, September 3, 2011 at 2:10pm
नीलीछत्री वाले !!
बदलोंका  सतरंगी आचल लेके
बदलता है आसमा रंग कैसे कैसे
चाँद  सुरज तारोंकी गैर मौजुद्गिमें
दगा देती है  तक़दीर कैसे कैसे
नीली छत्री वाला भी कभी उधार
लेता है सूरज चंदा तारे कैसे कैसे
ये तो नीली छत्री वाले का कमाल है
बुला लिया है तेरी छत्री मैं मुजे कैसे कैसे
विकासिनी !!

व्यर्थ !! by Vikasini Chavan on Friday, September 2, 2011 at 12:13pm

व्यर्थ !!

by Vikasini Chavan on Friday, September 2, 2011 at 12:13pm
व्यर्थ !!
आपल्याच सावलीला अस्तित्व कुठले ?
ओसाड वाळवंटी कुठले बीज रुजणे ?
शुष्क हृदयातले अस्तित्व जीव घेणे
अंधारात सावलीला व्यर्थ शोधणे
रुधीर परी हे काष्ट्य होता हरपणे
कसे झाड हे पाण्याविन फुलणे !!
विकासिनी!!

हे जीणे !! by Vikasini Chavan on Friday, September 2, 2011 at 9:50am

हे जीणे !!

by Vikasini Chavan on Friday, September 2, 2011 at 9:50am
हे जीणे !!
नको हे सारे भासातले जीणे
कसे जगावे श्वासातले असणे
श्वास कोंडूनी उछ्वासात गुदमरणे
शब्दांचे शब्दातील असे जीणे
साहवेना अभासातील हे हसणे
प्राणपाखराचे हे पंख असून नसणे
बांडगुळा परी असे हे जगणे
गर्भात प्राणाचे अस्तित्व साहणे
हृदय कवाडे हि बंद श्वासात
पूजीन तुजला बंद हृदयात
विकासिनी !!

नमन तूज माझे गणपती !! by Vikasini Chavan on Thursday, September 1, 2011 at 1:33pm

नमन तूज माझे गणपती !!

by Vikasini Chavan on Thursday, September 1, 2011 at 1:33pm
गजाजना मधुसुदना
तूच पंचप्राण दाता
तूच  तू  इकदंता
तूच सकलांचा त्राता
तूच जाणता नेणता
तूच तू अजाणता
तूज अर्पण पंचप्राण
तूज अर्पण हृदयकमल
तूज अर्पण नेत्रज्योती
नमन तूज माझे गणपती !!
विकासिनी!!

Friday 26 August 2011

मशाल !! by Vikasini Chavan on Friday, August 26, 2011 at 9:54pm

मशाल !!

by Vikasini Chavan on Friday, August 26, 2011 at 9:54pm
मशाल !!
मशाल तुझी पेटवण्यास
मी ज्वलंत निखारा व्हावे
विशाल तुझ्या हृदया जागवण्यास
मी हृदयातील शूल व्हावे
विझू नकोस पेटत राहा
आण तुला देशाची आहे
माणुसकीचे रक्षण करण्या
मशाल तुझी पेटली आहे
विझू नकोस पेटत राहा
वाण तुझ्या ओटी देशाचे आहे
मरणाच्या दारातच
जीवनाची सकाळ आहे
गर्भयातने  साहिल्या शिवाय
कुठे इथे बाळंतपण आहे
विकासिनी !!

बंदिशे !! by Vikasini Chavan on Friday, August 26, 2011 at 5:34pm

बंदिशे !!

by Vikasini Chavan on Friday, August 26, 2011 at 5:34pm
बंदिशे !!
मिलाने के बहाने मिलेंगे सौ
कैसे आये ?? दिलपे लगाम है सौ
कंहा कंहा भागे ?? दिलके रास्ते है सौ
अज भी दिलपे गुलामी के बंधन है सौ !
माँना की दिलकी खिड़कियाँ है सौ
आज भी भागने सारे रास्ते है बंद सौ
सूरज उगता है लेके रोशनी किरनोंकी सौ
आज भी शक की गुनजाइशो के रास्ते है सौ  !
रात की स्याही लिपटी है अन्धेरोमें सौ
आजभी आत्मा जखड़ी है परदो मैं सौ
दिल तो उड़ जायेगा समुन्दर सौ
मन तो अटका रहेगा बंदिशोंमें सौ !!
विकासिनी !!

ग़ज़ल !! by Vikasini Chavan on Thursday, August 25, 2011 at 9:12pm

ग़ज़ल !!

by Vikasini Chavan on Thursday, August 25, 2011 at 9:12pm
ग़ज़ल !!
दिलके जख्मोंपे हसती है ग़ज़ल
दिलके घाव करारे करती है ग़ज़ल
खुदके ही गम पे हसती है ग़ज़ल
प्रीतम की रुसवाई है ग़ज़ल
बेचारे दिल की बेबसी है ग़ज़ल
दिल को चीर चीर चीरती है ग़ज़ल
कभी अपनों के गम पे  तो कभी
दूसरोंके गम पे हसती है ग़ज़ल
तनहईयोंको और भी तड़पाती है ग़ज़ल
दिलकी बेकरारियां  बढाती है ग़ज़ल
कत्ले आम करती है ग़ज़ल
फिर भी हसती है क्यूँ ये गजल ??
बड़ी ख़ुफ़िया होती है ग़ज़ल
बेवफाई को रदीफ़ कहती है ग़ज़ल
अपने ही अश्क सहती है ग़ज़ल
फिर भी उफ़ तक न करती है ग़ज़ल
अच्छा है  मुजे नहीं आती है ग़ज़ल!!
अच्छा है मुज़े नहीं आती है ग़ज़ल !!
विकासिनी !!

अस्तित्व !! by Vikasini Chavan on Thursday, August 25, 2011 at 8:51pm

अस्तित्व !!

by Vikasini Chavan on Thursday, August 25, 2011 at 8:51pm
अस्तित्व !!
आज जागव तुझे अस्तित्व
आज जागव तुझे सामर्थ्य
आज दाखव तुझा साक्षात्कार
आज येवू दे तुझा प्रत्ययकार
आज जागव तुझे तू पण
आज संपवून टाक माझे मी पण
आज मिटू  दे सारा अन्याय,अत्याचार
जीवनभर तू असेच जगलास
आज करून टाक खेळ खल्लास
हे जग्ग्जेत्या !! हे जगत्विजेत्या !!
आज करून टाक दुर्जान्नांचा विनाश
आज जागव तुझे अस्तित्व
आज जागव तुझे सामर्थ्य !!
विकासिनी !!

अहिल्या !! by Vikasini Chavan on Wednesday, August 24, 2011 at 8:35am

अहिल्या !!

by Vikasini Chavan on Wednesday, August 24, 2011 at 8:35am
अहिल्या !!
वाट तुझी पाहून अहिल्या थकली
वाटेतच तिच्या अश्रूंची शिळा झाली
जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे
शिळेतले  आयुष्य शिळेलाच कळे
ध्यास रामाचा धरून का बसली ?
शाप कुणाचा वाटेत  घेवून बसली ?
वाट पाहण्या पलीकडे काय करू शकली ?
रामाला हि तिची दया काही नाही आली !
देव होता पण त्याला कळून नाही चुकली
वाट पाहून तुझी  हि अहिल्या थकली !!
विकासिनी !!